शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती, वर्धेत बंडखोरांच्या मदतीने काँग्रेस, भाजपला सत्ता

By admin | Updated: September 22, 2014 00:51 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अमरावती, वर्धा व यवतमाळ येथे सत्ताधारी आघाडी-युतीमध्ये बदल झाला. त्यापैकी अमरावती येथे राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडावे लागले,

नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत अमरावती, वर्धा व यवतमाळ येथे सत्ताधारी आघाडी-युतीमध्ये बदल झाला. त्यापैकी अमरावती येथे राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर पडावे लागले, तर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय खोडके यांचा गट महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे सत्तेत कायम राहिला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का समजला जात आहे. वर्धेत माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर सत्ता गमावण्याची पाळी आली. काँग्रेसला नागपूर, चंद्रपूर गडचिरोली व यवतमाळ येथे दिलासा देणारी घटना घडून राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी असलेला घरोबा मोडला. नागपूर व चंद्रपूर येथे भाजप आणि गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची सत्ता कायम राहिली.नागपूर जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यात शिवसेना-भाजप युतीला यश आले. अध्यक्षपदी भाजपच्या निशा सावरकर तर उपाध्यक्ष म्हणून शिवसेनेचे शरद डोनेकर यांची निवड करण्यात आली. सावरकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या शालू हटवार यांचा तर डोनेकर यांनी उज्ज्वला बोढारे यांचा पराभव केला. युतीच्या बाजूने ३२ तर आघाडीच्या उमेदवारांना २६ मते पडली. गेल्या वेळी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. जि.प.च्या ५८ सदस्यात युतीचे २९ सदस्य असून रिपाइं, बसपा आणि गोगपाचा प्रत्येकी एक अशा तीन सदस्यांनी युतीला साथ दिल्याने संख्याबळ ३२ झाले.अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्ष तर, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या वऱ्हाड विचार मंचचे सतीश हाडोळे हे उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांनी बंडखोरी करुन स्वतंत्र वऱ्हाड विचार मंच या नावाने गट स्थापन केल्याने राष्ट्रवादीला जबर धक्का बसला, हे विशेष.अमरावती जिल्हा परिषदेत ५९ सदस्य संख्या असून अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सतीश उईके तर भाजपचे जयप्रकाश पटेल यांचे नामांकन दाखल होते. मात्र जयप्रकाश पटेल यांनी कागदपत्रांची योग्य पूर्तता केली नसल्याने पटेल यांचा अर्ज खारीज केला तसेच उपाध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज भाजपचे जयप्रकाश पटेल व शिवसेनेचे कृष्णराव पवार यांनी अर्ज मागे घेतले. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा, प्रहारचे सदस्य व बसपाचे अभिजित ढेपे हे अनुपस्थित होते. सदस्यांच्या पळवापळवी करून वर्धेत भाजपाने काँग्रेसकडून सत्ता हिसकाविला. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपाने सर्वशक्तिनिशी जिल्हा परिषदेची सत्ता बळकावल्याने आघाडीला मोठा हादरा बसला आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाच्या चित्रा रणनवरे आणि काँग्रेसच्या उषाकिरण थुटे यांच्यात झालेल्या सरळ लढतीत थुटे यांचा पराभव केला, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे विलास कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कामनापुरे यांच्यात सरळ लढत झाली. यात कामनापुरे यांचा पराभव झाला. भाजपाच्या नेत्यांनी एकत्रितपणे दत्ता मेघे यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक लढली आणि सत्ता हस्तगत केली. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ. आरती फुफाटे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांची रविवारी निवड करण्यात आली. अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी अडीच वर्ष राष्ट्रवादी, सेना, भाजपाची युती होती. मात्र यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली. राष्ट्रवादीच्यावतीने अध्यक्षपदासाठी डॉ. आरती फुफाटे यांनी तर त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या मंदा गाडेकर यांनी आणि उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्यावतीने बाळासाहेब मांगुळकर यांच्याविरुद्ध भाजपाचे अमन गावंडे यांंनी अर्ज दाखल केला. चंद्रपुरात भाजप पुन्हा सत्तेवर आली असूृन अध्यक्षपदी संध्या गुरनुले तर उपाध्यक्षपदी कल्पना बोरकर विजयी झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी गुरनुले यांना ३० मते तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँंग्रेसच्या ज्योती जयस्वाल यांना २६ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्पना बोरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर बोडलावार यांचा ३० विरूद्ध २६ अशा मतांनी पराभव केला. काँगे्रसच्या चित्रा डांगे यांनी सभागृहात उपस्थित राहूनही तठस्थ भूमिका घेत मतदान करण्याचे टाळले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पंकज पवार यांनी भाजपाला मतदान केल्याने काँग्रेस-राकॉ आघाडीला दोन मतांचा फटका बसला. गेल्या वेळीही भाजपाने मित्रपक्षांच्या विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने अध्यक्षपद मिळवून सत्ता आपल्याकडे राखली होती. मात्र यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत राहण्याचे ठरविले.गडचिरोलीत गेल्यावेळी या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप अशी सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे परशुराम कुत्तरमारे तर उपाध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य जीवन पाटील नाट निवडून आले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुत्तरमारे यांना २८ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या वर्षा कौशिक यांना २२ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे जीवन नाट यांना २८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सदस्य अतुल गण्यारपवार यांना २० मते मिळाली. मतदानाला एक सदस्य गैरहजर होता तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन सदस्य तटस्थ राहिले. (प्रतिनिधी)