शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अमरावतीमध्ये लब्धप्रतिष्ठितांचा घोरपडीवर ताव

By admin | Updated: July 18, 2016 20:24 IST

घोरपड या वन्यजीवाचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर धाड घालण्यात आली. यातील केवळ एका आरोपीला वनविभागाने अटक केली आहे. रविवारी रात्री २ वाजताच्या

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. १८ -  घोरपड या वन्यजीवाचे मांस शिजवून पार्टी करणाऱ्या लब्धप्रतिष्ठितांवर धाड घालण्यात आली. यातील केवळ एका आरोपीला वनविभागाने अटक केली आहे. रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास पिंपळखुटा गावानजीकच्या संत्राबागेत हा प्रकार उघड झाला. मारोती सहदेव वाघमारे (६५) असे अटकेतील आरोपीचे नाव असून शेतमालक मनोज वसंत जगताप याच्यासह अन्य नऊ जण घटनास्थळावरून पसार झालेत. वनविभागाने घोरपडीचे शिजविलेले मांस व अन्य साहित्य घटनास्थळावरून जप्त केले. वनविभागाला मिळालेल्या माहितीवरून उपवनसरंक्षक हेमंत मिना यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या पथकाने पिंपळखुटा येथील मनोज जगताप यांच्या शेतशिवारात धाड टाकली. त्यावेळी तेथील संत्रावाडीत पार्टी सुरू असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. वनकर्मचाऱ्यांना पाहताच घोरपडीच्या मटणावर ताव मारणाऱ्यांनी तेथून पोबारा केला. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी चौकीदार मारोती वाघमारे याला ताब्यात घेतले. शेतमालकांसह अन्य नऊ जण पसार झालेत. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे शिजविलेले मांस व हाडांचे काही तुकडे आढळून आले. घटनास्थळावरून मांस, हांडांचे तुुकडे, कुऱ्हाड, सुरी, भांडे असे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणात वनविभागाने आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९७२ मधील कलम ९, ३९,(३) (अ) (ब) (क), ४४, (१), (बी), (३८(अ), ४९, ४९बी, (१) (बी) ५१ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. शिजविलेले ते मांस तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणातील पसार झालेल्या अन्य आरोपींना अटक करण्याकरिता तीन पथके विविध भागांत रवाना झाली आहेत. शेतमालकाने दिली घोरपडीची मेजवानी

पिंपळखुट्यातील शेतमालक मनोज जगताप याने त्याच्या मित्र मंडळीला घोरपडीची मेजवानी देण्यासाठी बोलाविले होते. मात्र, त्याचवेळी वनविभागाने ही धाड टाकली. त्यावेळी जगतापसह त्याचे मित्र असलेले अभियांत्रिकी महाविद्यालयातील लेखापाल रवींद्र इंगळे, विलास डहाके (रा.पिंपळखुटा) यांच्यासह सहा आरोपी पसार झालेत. या कारवाईत सहायक वनसरंक्षक राजेंद्र बोंडे, वनाधिकारी अशोक कविटकर, सहायक वनसरंक्षक एस.डी.सोनवने, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.पडगव्हाणकर, पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे, पिंपळखुटा बिटचे वनरक्षक ए.जी. महाजन, वनकर्मचारी मनोज ठाकूर, विजय बारब्दे, अमोल गावनेर, वनरक्षक फरतोडे, अनिता वसे, नीलेश करवाळे, बाबुराव येवले, आर.आर.खडसे, नितीन नेतनवर, विलास देशमुख, पी.बी.शेंडे यांनी सहभाग घेतला.पाच ते सहा घोरपडी मारल्याची शंका पिंपळखुटा शेतशिवारातील घोरपडीच्या मासांच्या मेजवानीत सहभागी आरोपींनी पाच ते सहा घोरपडीची शिकार करून मांस शिजविल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावरून जप्त केलेल्या मटणावरून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.वनाधिकाऱ्यांनी धाड टाकून पिंपळखुटा येथील एका शेतातून घोरपडीचे मांस शिजविताना एकाला अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. - संजीव गौड, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक). घोरपड या वन्यप्राण्याचे मांस शिजविणाऱ्या एकाला ताब्यात घेतले, तर नऊ आरोपी पसार झालेत. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.- हेमंत मिना, उपवनसरंक्षक, अमरावती.