शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती संमेलन अमरावतीला

By admin | Updated: March 18, 2017 02:34 IST

देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून या वेळी संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती

मुंबई : देशातील पाचव्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आले असून या वेळी संमेलनाचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध खंजेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज तर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष अमरावतीचे पालकमंत्री, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील राहणार आहेत. १९ आणि २० मार्च रोजी आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श ठरलेल्या २५ व्यक्ती तसेच १६ संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मनोरंजन तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. विचारमंथन करण्यात येणार आहे. राज्यातील विविध विषयांतील मान्यवर विचारवंत, अभ्यासक, लेखक चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी नशाबंदी मंडळाच्या वतीने ‘व्यसनमुक्तीचा आॅर्केस्ट्रा’चे आयोजन केले आहे. संमेलनाच्या शेवटच्या सत्रात संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय साहित्य संमेलनाला कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)