शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार, चौघांना अटक

By admin | Updated: April 19, 2016 15:59 IST

पुण्यात अमरावतीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९  -  पुण्यात अमरावतीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या दोन मित्रांसह चौघांना अटक केली आहे.
पीडित मुलगी ही मुळची अमरावतीची असून ती पुण्यात एका खासगी कंपनीत काम करत आहे. तिने दिलेल्या तक्रारीत तिचा मित्र विकी याने फोन करून जेवण करायला बाहेर जाऊ असे सांगून रविवार दिनांक १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३०च्या सुमारास वारजे पूला खालून गाडीत बसवले. त्यानंतर चांदणी चौक मार्गे वाकडला जात असताना बावधन परिसरात चालू गाडीत विकीने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर पिंपळे गूरव या ठिकाणी त्याचा आणखी एक मित्र गाडीत बसला व तेथून पुढे गाडी देहू रोडला नेण्यात आली.
देहू येथे हे सर्व जण मित्राच्या साखरपुडयाला गेले. मात्र या कार्यक्रमाला जात असताना आरोपींनी पीडितेस गाडीत बसवून गाडी लॉक केली, असे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पीडित मुलीने सांगितले आहे. यानंतर हे सर्व जण रात्री अकरा वाजता निघाले. त्यानंतर गाडीत असलेल्या अगोदरच्या तिघांखेरीज आणखी  एक अनोळखी व्यक्ती गाडीत आली. त्यानंतर वाटेत लागलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण केले. या ठिकाणी सर्वांनी मद्य प्राशन केले. तसेच पाडितेसही जबरदस्तीने मद्य पाजले. दरम्यान, यानंतर मनिष नावाचा मुलगा या ठिकाणाहून निघून गेला. त्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी पीडितेवर अत्याचार केला.
या सर्व घटनेनंतर पीडित मुलीने १०० क्रमांकावर फोन लावला असता विकी नावाच्या मुलाने फोन हिसकावून घेत. फोन बंद केला व मनिषला त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर मनिषने पीडित मुलीचा गळा दाबून हाताने मारहाण केली व पोलीस आमचे काही बिघडू शकत नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी कलम ३७६, ड ३५४ , ५०६ , ५०४, ३२३ , ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.