शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती भागात ८ लाख क्विंटल तूर मोजणी बाकी

By admin | Updated: May 4, 2017 03:43 IST

विभागातील ५४ तूरखरेदी केंद्रावरील गोंधळ कायम असल्याने मोजणीचा वेग मंदावलेला आहे. बुधवारपर्यंत या केंद्रांवर ३४ हजार ५३९ शेतकऱ्यांची

अमरावती : विभागातील ५४ तूरखरेदी केंद्रावरील गोंधळ  कायम असल्याने मोजणीचा वेग मंदावलेला आहे. बुधवारपर्यंत या केंद्रांवर ३४ हजार ५३९ शेतकऱ्यांची ७ लाख ८१ हजार २६६ क्विंटल  तूर मोजणी शिल्लक होती.  त्यातच खरीप हंगाम महिन्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.२२ एप्रिल रोजी सर्व तूरखरेदी केंद्रे बंद केल्यानंतर अमरावती विभागातील ५४ केंद्रांवर ३७ हजार ७६८ शेतकऱ्यांची ८ लाख ४२ हजार ५२६ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत होती.  शासनाने ही तूर खरेदी करण्याचा निर्णय २७ एप्रिल रोजी घेतला. मात्र, बारदाना, ग्रेडर व गोदाम उपलब्ध नसल्याने अनेक खरेदी केंद्रे बंदच होती. दोन दिवसांपासून बहुतांश केंद्रांवर खरेदी सुरू झाली असली, तरीही मोजणीचा वेग मंदावलेलाच आहे. शासनाने या केंद्रांवर पडताळणी व ग्रेडिंगसाठी  समित्या नियुक्त केल्या आहेत. बुधवारपर्यंत शिल्लक तुरीपैकी तीन हजार २५९ शेतकऱ्यांची ६१ हजार २५९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. (प्रतिनिधी)