शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला थेट मिळणार तिकीट सवलतीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:42 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) देण्यात येणाऱ्या सवलतीच्या तिकीट रकमेचा परतावा, आता थेट गृहविभागाकडून देण्यात येणार आ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) देण्यात येणाऱ्या सवलतीच्या तिकीट रकमेचा परतावा, आता थेट गृहविभागाकडून देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून तब्बल २४ घटकांना सवलतीच्या दरात तिकीट दिले जाते. ही रक्कम परत मिळण्यासाठी संबंधित खात्यांमधून विलंब होतो. त्यामुळे आता थेट गृहविभागाकडून सवलतीची १ हजार ३०० कोटींची रक्कम देण्यात येणार आहे.तिकिटाच्या दरांतील सवलतीमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्ग, अंध-अपंग व्यक्ती, कर्करोगग्रस्त विद्यार्थी, पुरस्कारप्राप्त खेळाडू, माजी आमदार अशा अन्य वर्गांचा समावेश आहे. परिणामी, अशा २४ वर्गांचा सामान्य प्रशासन विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, माहिती-जनसंपर्क विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अदिवासी विभाग, महिला व बालकल्याण विभाग अशा संबंधित विभागांचा समावेश आहे. संबंधित विभागांकडून परताव्याची रक्कम विलंंबाने मिळते. ही रक्कम वेळेवर मिळावी, यासाठी परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार, अनेक विभागांपेक्षा ही रक्कम थेट गृहविभागातून देण्यात येणार आहे. अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.राज्यातील खेडोपाडी धावणाऱ्या एसटीच्या सेवेत विविध प्रवर्गासाठी सवलतीच्या दरात तिकीट आकारले जाते. त्या प्रवर्गातील सवलतीची रक्कम संबंधित खात्यामार्फत एसटी महामंडळाकडे जमा करण्यात येते. मात्र, ही रक्कम मिळण्यासाठी संबंधित खात्यांकडून अनेक अडचणी समोर येतात. त्यामुळे प्रत्यक्षात मात्र, ही रक्कम विलंबाने मिळते. योग्य वेळी रक्कम न मिळाल्याने एसटीचा आर्थिक डोलारा ढासळतो, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.जनसंपर्क विभागानेच दिली वेळेत रक्कमशासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागानेच सवलतीच्या दरातील रक्कम वेळेत एसटी महामंडळाकडे जमा केली आहे. राज्यातील पत्रकारांसाठी राज्यभर सवलतीच्या दरात आणि बहुतांशी ठिकाणी मोफत पास देण्यात येतो. त्यानुसार, देय असलेली रक्कम माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात येते. हा विभाग वगळता उर्वरित विभागाकडून रक्कम येण्यास विलंब होत असल्याची माहिती, नाव न छापण्याच्या अटीवर एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.