शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन लांबविली लाखाची रक्कम

By admin | Updated: January 7, 2017 01:05 IST

आॅनलाईन फ्रॉडद्वारे नागरिकांच्या खात्यांमधून १ लाख १८ हजार ७३५ रुपये काढून घेण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या

पुणे : आॅनलाइन फ्रॉडद्वारे नागरिकांच्या खात्यांमधून १ लाख १८ हजार ७३५ रुपये काढून घेण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या असून याप्रकरणी विश्रामबाग, कोंढवा, विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समीर शिंदे (वय ३३, रा. शिवाजीनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गौतम मंडरल (रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शिंदे यांच्या मोबाईलवर फोन केला. चांगल्या कस्टमर केअरचा नंबर पाहिजे असल्यास २५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. शिंदे यांचे नारायण पेठेत दुकान आहे. आरोपीच्या सांगण्यावरून शिंदे यांनी ही रक्कम भरली. परंतु त्यांना नवीन कस्टमर नंबर देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली. तर कोंढव्यात घडलेल्या दुसऱ्या घटनेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेश इंद्रायनी (वय ५८, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. इंद्रायनी यांना बुधवारी एकाने मोबाईलवर फोन करुन बँक खात्याला एलपीजी गॅससाठी सबसिडी लिंक करायची असल्याचे सांगितले. त्यांच्या क्रेडिट कार्डाचा क्रमांक, सीव्हीसी क्रमांक व ओटीपी मागवून घेतला. या माहितीचा वापर करुन पेटीएमद्वारे ४७ हजार ७३५ रुपये काढून घेत फसवणूक केली. (प्रतिनिधी)>एटीएमच्या रांगेत उभ्या असलेल्या अशोक शिरभाते (वय ६१, रा. विमाननगर) यांच्या जवळचे एटीएम कार्ड घेऊन त्याद्वारे ४६ हजारांचे सोने खरेदी करण्यात आले. ही घटना विमाननगर येथील गिगास्पेसजवळ १९ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी सय्यद कलाऊदिन खान (वय २३, रा. वडगावशेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.