शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समान पाणी योजनेच्या निविदेत गैरव्यवहार

By admin | Updated: July 13, 2017 01:02 IST

समान पाणी योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम चारच कंपन्यांनी साखळी करून मिळवले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : समान पाणी योजनेअंतर्गत शहरात नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम चारच कंपन्यांनी साखळी करून मिळवले असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधकांनी केला. सर्व निविदा निश्चित रकमेपेक्षा सरासरीने २६ टक्के दराने जास्त असल्याने यात प्रशासनही सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. १ हजार ७४८ कोटी रुपयांचे हे काम आहे व जादा दरामुळे त्यात महापालिकेला सुमारे ४०० कोटी रुपयांचा फटका बसेल.विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हा आरोप केला. शिंदे यांनी याआधीच कोणत्या चार कंपन्या यात निविदा दाखल करणार आहेत ते जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्याच चार कंपन्यांनी या निविदा दाखल केल्या आहेत. १ हजार ७४८ कोटी रुपयांच्या एकाच प्रकारच्या कामाचे चार तुकडे करून त्याप्रमाणे निविदा मागवण्यात आल्या होत्या. चार कंपन्यांनी प्रत्येक कामासाठी प्रत्येकी चार निविदा दाखल केल्या. त्यात चौघांपैकी एकाने प्रत्येक कामात दुसऱ्यापेक्षा कमी दराने, पण एकूण कामापेक्षा जास्त दराची अशी निविदा दाखल केली. त्यामुळे दाखवण्यासाठी स्पर्धाही झाली व प्रत्येकाला कामही मिळाले. हे सर्व प्रशासन व अधिकारी यांच्या संगनमतातून ठरवून झाले असल्याचे तुपे व शिंदे म्हणाले. प्रत्येक निविदा साधारण २६ टक्के जादा दराने आलेली आहे. महापालिकेला त्याच्या एकूण कामात ४०० कोटी रुपयांचा फटका बसेल.>फेरनिविदा काढावीकात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाची जादा दराने आलेली निविदा राज्य सरकारने हस्तक्षेप करून रद्द करायला लावली. आता या त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च असलेल्या कामाच्या निविदेतही सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी तुपे, शिंदे यांनी केली. या संपूर्ण कामाची फेरनिविदा काढावी, अशी मागणी त्यांनी केली. पारदर्शकता शब्दाचा योग्य वापर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही संधी आहे, असे ते म्हणाले. सरकारने दखल घेतली नाही, तर या निविदा प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.>पाणी योजनेसारखी कामे दीर्घकाळ सुरू राहतात. त्यामुळेच कंपन्या त्याचा विचार करून जादा रकमेच्या निविदा दाखल करतात. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात भामा आसखेड किंवा पर्वती जलशुद्धीकरणाच्या निविदाही ३० टक्के जादा दराने आल्या होत्या.- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती>धनकवडी : येथील राजे चौक परिसरात बुधवारी सायंकाळी ४ वाजता जलवाहिनीवर बसवण्यात आलेला प्रेशर व्हॉल्व्ह पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दुरुस्त करीत असताना हजारो लिटर पाणी वाया गेले. उताराकडे येणाऱ्या मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीमधील पाणी दाबाने बाहेर पडले आणि रस्त्यावरून वाहून गेले.प्रेशर व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे आंबेगाव पठार परिसराला पाणीपुरवठा होणार नव्हता. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. खोदाई करून व्हॉल्व्हची पाहणी केल्यावर, त्यातील महत्त्वाचा भाग निकामी झाल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण व्हॉल्व्ह खोलून वर काढताच जलवाहिनीतील शिल्लक साठलेले पाणी मोठ्या दाबाने बाहेर पडले आणि रस्त्यावरून लोट वाहू लागले. त्यानंतर तळजाई पाण्याच्या टाकी परिसरातील व्हॉल्व्ह बंद करण्यात आला. दरम्यान, जलवाहिनीत साठलेले पाणी तासाभरात हजारो लिटर वाहून गेले. काही दुकानांसमोर पाण्याची तळी साठली होती.