शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘दिलेली रक्कम निवृत्ती वेतनातून वसूल करता येणार नाही’

By admin | Updated: June 16, 2017 00:41 IST

शासकीय सेवेत असताना विविध कारणांनी दिली गेलेली जादाची रक्कम निवृत्ती वेतनातून वसूल करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय सेवेत असताना विविध कारणांनी दिली गेलेली जादाची रक्कम निवृत्ती वेतनातून वसूल करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांनी मंगळवारी दिला. डेअरी डेव्हलपमेंटच्या सेवानिवृत्त रेफ्रिजरेटर आॅपरेटरकडून वसूल केलेले ११ लाख रुपये दोन महिन्यांत परत करण्याचे आदेशही मॅटने शासनाला दिले आहेत.दिलीप एम. दिवाणे असे या रेफ्रिजरेटर आॅपरेटरचे नाव आहे. ते नाशिकच्या प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयात वर्ग ३चे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. दिवाणे यांना १९९३ला बढती दिली. परंतु त्यांच्या विनंतीनुसार नंतर ही बढती रद्द रद्द केली. शासनाच्या १९९५च्या जीआरनुसार त्यांना कालबद्ध पदोन्नती मिळाली. ही पदोन्नती मिळाल्यास व नियमित पदोन्नती नाकारल्यास पदोन्नतीचे लाभ मिळणार नाही, या शासनाच्या नियमाचा हवाला देत दिवाणे यांच्याकडे पदोन्नतीपोटी जादा दिलेल्या ११ लाख रुपयांची रिकव्हरी काढली. १९९४ ते २०१३ या काळातील ही रक्कम दिवाणे यांच्या निवृत्ती वेतनातून वसूलही केली. या विरोधात दिवाणे यांनी मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली.