शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृउबासच्या माजी संचालकांकडून वसूल होणार आर्थिक अपहाराची रक्कम

By admin | Updated: January 9, 2016 02:38 IST

जिल्हा उपनिबंधकांनी दिले आदेश, १५ दिवसात ६६ लाख ६२ हजाराची वसुली करण्याचे आदेश.

बळीराम वानखडे/खामगाव: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या आर्थिक अपहारप्रकरणी १८ संचालक आणि तत्कालीन सचिव यांच्याकडून ६६ लाख ६२ हजार ४२६ रूपये १५ दिवसात वसूल करावे, अन्यथा १५ दिवसात त्यांच्याविरूद्ध न्यायालयात दावा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिले असून, दोन्ही प्रक्रियेत कसूर झाल्यास विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २00९ ते २0१४ पर्यंत सभापती राजाराम काळणे, उपसभापती गोपाळराव कोल्हे आणि त्यांचे संचालक मंडळ अस्तित्वात होते. या काळात झालेल्या आर्थिक अपहाराबाबत सामाजिक कार्यकर्ते नंदु भट्टड यांनी तक्रार करून, याप्रकरणी ११ मुद्यांवर चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीनुसार नऊ मुद्यांवरील चौकशी अहवाल १४ डिसेंबर २0१४ रोजी बुलडाणा जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला होता. याप्रकरणी चौकशी करण्याचे करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक एम.ए. कृपलानी यांना देण्यात आले होते. सहायक निबंधकांनी चौकशी करून आर्थिक अनियमिततेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्व १८ संचालक आणि तत्कालीन सचिवांवरही ठपका केल्याने खळबळ उडाली होती. सर्व जण प्रत्येकी ३ लाख ५0 हजार ६६४ रुपयांच्या अपहारासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट करून, त्यांनी एकूण ६६ लाख ६२ हजार ४४६ रुपयांची जबाबदारी निश्‍चित केली होती. हा चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे ४ जानेवारी रोजी सादर करण्यात आला. जिल्हा उपनिबंधकांनी यांनी ७ जानेवारी रोजी यासंदर्भात आदेश देऊन, दोषींकडून ६६ लाख ६२ हजार ४२६ रूपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.