शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

लेटरबॉम्बमध्ये अमोनियम नायटे्रट

By admin | Updated: May 11, 2016 01:17 IST

नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) आणि रानडे इन्स्टिट्यूटला पाठविण्यात आलेल्या ‘लेटरबॉम्ब’सोबत पाठवण्यात आलेल्या डिटोनेटरसह ‘अमोनियम नायटे्रट’ पावडर असल्याचे समोर आले आहे

पुणे : नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) आणि रानडे इन्स्टिट्यूटला पाठविण्यात आलेल्या ‘लेटरबॉम्ब’सोबत पाठवण्यात आलेल्या डिटोनेटरसह ‘अमोनियम नायटे्रट’ पावडर असल्याचे समोर आले आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या तपासणीमधून ही बाब उघडकीस आली असून हे पार्सल दोन्ही संस्थांना पोहोचवणाऱ्या पोस्टमनचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. एफटीआयआय आणि रानडे इन्स्टिट्यूटला शनिवारी पोस्टाद्वारे डिटोनेटर, स्फोटक पावडरसोबत ‘तुम्ही कन्हैयाकुमारला पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही हाय एक्स्प्लोजिव्ह पाठवत आहोत,’ असे पत्र पाठविण्यात आले होते. या दोन्हीही पार्सलमधील स्फोटके आणि पत्र सारखेच असल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्फोटके पुण्यामधूनच पाठविण्यात आलेली असून पोस्टाकडून माहिती मागवण्यात येत आहे. हे पार्सल नेमके कोणत्या पोस्ट पेटीमधून कोणत्या मार्गाने दोन्ही संस्थांमध्ये पोहोचले, त्याचा शोध सुरू आहे. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. >ज्या दोन पोस्टमनने हे पार्सल एफटीआयआय आणि रानडेमध्ये पोहोचवले आहेत त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यासोबतच जिलेटिन, डिटोनेटर विकणाऱ्या विक्रेत्यांकडेची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडला आलेल्या स्फोटकांमध्ये आणि या दोन्ही संस्थांना आलेल्या स्फोटकांमध्ये साम्य असून या प्रकरणांचा तपास शेवटपर्यंत नेणार असून यामागे नेमके कोण आहे, याचा शोध नक्की घेतला जाईल, असे हिरेमठ यांनी सांगितले.