शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ यांनी जीएसटीची जाहिरात थांबवावी

By admin | Updated: June 22, 2017 05:46 IST

वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांनी जीएसटीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनून त्याची जाहिरात करू नये, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. देशात १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सध्या अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या जाहिरातींचे प्रसारण सुरू आहे. जीएसटीसाठी आवश्यक तयारी झालेली नाही, याची कल्पना असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली हा कायदा रेटत आहेत. त्याचे खापर आपल्याऐवजी इतरांवर फुटावे म्हणूनच सरकारने अमिताभ यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविण्याचा घाट घातल्याचा आरोप निरुपम यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे. सोशम मीडियात यासंदर्भात येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून अमिताभ यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. जीएसटीबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या सूचनेनुसार ही जाहिरात तयार करण्यात आली आहे. त्यांनी जे सांगितले तेच जाहिरातीत मांडण्यात आल्याचे अमिताभ यांनी स्पष्ट केले आहे.