शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी हवेत अमिताभ, शाहरुख!

By admin | Updated: April 15, 2015 00:55 IST

चित्रपटाविषयी ग्लॅमरचे मुलांना आकर्षण असो की नसो, पण पालकांना मात्र आपल्या मुलाने अमिताभ, शाहरुख खान व्हावे, अगदीच नाही तर छोट्या पडद्यावरील ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये झळकावे,

पुणे : चित्रपटाविषयी ग्लॅमरचे मुलांना आकर्षण असो की नसो, पण पालकांना मात्र आपल्या मुलाने अमिताभ, शाहरुख खान व्हावे, अगदीच नाही तर छोट्या पडद्यावरील ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये झळकावे, असे वाटत असते. त्यामुळे सुट्टीचा मोसम सुरू झाल्याबरोबर मुलांना अभिनय आणि नृत्य शिबिरांना पाठविण्यात सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. एक काळ असा होता की शाळांना ‘उन्हाळी’ सुट्या लागल्या की, मुले ‘मामाच्या गावाला जायची’ किंवा मैदानी अथवा कॅरम, पत्ते यासारख्या बैठ्या खेळांमध्ये गुंतायची. मात्र, आता सुट्टीच्या काळातही मुलाने काहीतरी शिकावे, या कल्पनेने पालक सुट्टीच्या आधीपासून विचारात गढलेले असतात. उन्हाळी शिबिरांची संख्या वाढत आहे. नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ न शकणाऱ्या पालकांमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या अशा शिबिरांना पाठविण्याचा ओढा वाढला आहे. त्यातही आता चित्रपट आणि जाहिरातींमध्ये साततत्याने झळकणाऱ्या लहान मुलांच्या चेहऱ्यांमुळे आणि नृत्यविषयक ‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे ‘अभिनय आणि नृत्य’ शिबिरांना पालकांची सर्वाधिक पसंती मिळू लागली असून, ही शिबिरे जवळपास ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या शहराच्या विविध भागांत अभिनय-नाट्य शिबिरे तसेच कार्यशाळांचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत. शिबिरांच्या चौकशीसाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात आहे. पैसा आणि प्रसिद्धीच्या चक्रव्यूहात पालकांची मानसिकता गुरफटत चालल्याचे हे काही अंशी द्योतक मानता येईल. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले याबाबत म्हणाल्या, ‘कला’ ही अंगभूत असावी लागते, ती प्रत्येकातच असते. केवळ गरज असते ती त्या कलेला वाव देण्याची. त्यादृष्टीने ही शिबिरे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण आपल्या मुलाचा कल कुठे आहे, हे पाहूनच त्याला योग्य त्या शिबिरात घालणे आवश्यक आहे. आपल्याला वाटते म्हणून पालकांनी मुलांना विशिष्ट शिबिरांना पाठविणे चुकीचे आहे. नेमके सध्या हेच होत आहे. शिबिरे हा व्यक्तिमत्त्व विकासाचा एक भाग असतो. ७ किंवा १० दिवसांत कोणताही मुलगा अभिनेता किंवा अभिनेत्री होऊ शकत नाही. तरीही या शिबिराद्वारे आपली मुले जाहिरातीत झळकतील किंवा चित्रपटांत दिसतील हा पालकांचा समजच योग्य नाही. मुलांमधील कलागुण विकसित व्हावेत, आत्मविश्वास वाढावा, संवादकौशल्य निर्माण व्हावे हा उद्देश असायला हवा. (प्रतिनिधी)४मुलांचा कल नक्की कशात आहे हे पाहून मुलांना अशा शिबिरांना पाठविले जावे. आपल्या मुलांना व्यावसायिक संधी तातडीने मिळावी अशी पालकांची अपेक्षा असते. पण अशी उन्हाळी शिबिरे ही अभिनयाची ओळख करून देण्यापुरती असतात. मुलांना खरच या क्षेत्रात पाठवायचे असेल तर पालक आणि मुले दोघांनाही संघर्ष करावा लागतो. मुलांना विविध ठिकाणी आॅडिशन्सला न्यावे लागते, मुलांमध्ये क्षमता असेल तर नक्कीच संधी मिळते, पण त्यासाठी संयमाची आवश्यकता असल्याचे अभिनेत्री आणि अभिनय अ‍ॅकॅडमी संचालक मधुराणी प्रभुलकर हिने स्पष्ट केले.रिअ‍ॅलिटी शोची जणू जत्राच भरलीयमराठी चित्रपटसृष्टीत लहान मुलांशी संबंधित चित्रपटांनी यशाची शिखरे गाठली आहेत. जाहिरातींमध्येही मुले चमकत आहेत, विविध वृत्तवाहिन्यांवर नृत्याशी निगडित ‘रिअ‍ॅलिटी शो’ची जत्राच भरल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टी कमीतकमी वेळेत झटपट प्रसिद्धी देणाऱ्या असल्यामुळे पालकांचा कल अशा शिबिरांकडे वाढत असल्याचे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.