शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

टीसीपीच्या उदघाटनाला अमिताभ बच्चन?

By admin | Updated: March 2, 2017 03:40 IST

रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपीचे उद्घाटन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते येत्या काही दिवसांतच होण्याची दाट शक्यता आहे

प्रज्ञा म्हात्रे,ठाणे- बंदींच्या मनोरंजनासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाने तयार केलेल्या रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपीचे उद्घाटन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते येत्या काही दिवसांतच होण्याची दाट शक्यता आहे. बच्चन यांना बोलावण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरूनच प्रयत्न केले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींचे ज्ञानाबरोबर मनोरंजन व्हावे, त्यांचा वेळ चांगला जावा तसेच त्यांना चांगली गीते ऐकायला मिळावी, या उद्देशाने कारागृह प्रशासनाने वर्षभरापूर्वीच रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपी तयार केले. परंतु, सेलिब्रेटीजच्या तारखा मिळत नसल्याने उद्घाटनच लांबणीवर पडले आहे. हे उद्घाटन बच्चन यांच्या हस्ते व्हावे, असा आग्रह याआधी कारागृह प्रशासनाने धरला होता. मात्र, त्यांची तारीख मिळत नसल्याने सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आमीर खान यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, बच्चन यांच्यानंतर आमीर यांचीदेखील तारीख न मिळाल्याने टीसीपीच्या उद्घाटनाला मोठाच ब्रेक लागला. या टीसीपीच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी उजाडेल, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला असताना हा मुहूर्त येत्या काही दिवसांतच मिळणार आहे. नामवंत कलाकारांच्याच हस्ते टीसीपीचे उद्घाटन व्हावे, असा आग्रह कारागृह प्रशासनाचा असल्याने ते त्या दृष्टीने प्रयत्नदेखील करीत आहेत. उद्घाटक म्हणून बच्चन यांच्या नावाची आता पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या रेडिओ स्टेशनचे येत्या दोन आठवड्यांतच उद्घाटन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.>बच्चन यांना बोलावण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत विचारता कारागृह अधीक्षक नितीन वायचळ म्हणाले की, नामवंत कलाकारांनाच उद्घाटनासाठी आमचा प्रयत्न असून या रेडिओ स्टेशनचे येत्या दोन आठवड्यांतच उद्घाटन केले जाईल.