शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांना महाराष्ट्र प्रभारींसाठी आग्रह

By admin | Updated: May 18, 2014 11:40 IST

गुजरातमधून लोकसभेच्या सर्व जागा भाजपाला एकहाती मिळवून देणार्‍या अमित शहा यांना भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी बनविण्यासाठी राज्यातील भाजपा नेते उत्सुक आहेत.

राजेश निस्ताने

गुजरातमधून लोकसभेच्या सर्व जागा भाजपाला एकहाती मिळवून देणार्‍या अमित शहा यांना भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी बनविण्यासाठी राज्यातील भाजपा नेते उत्सुक आहेत. नरेंद्र मोदी लाटेमुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाच्याच नव्हे तर शिवसेनेच्याही जागा वाढल्या आहेत. हेच वातावरण कायम राहिल्यास राज्यातही युतीचे सत्ता येणे कठीण नाही, याची जाणीव भाजपा नेत्यांंना झाली आहे. म्हणूनच की काय त्यांनी आगामी विधानसभेच्या दृष्टीने तयारीही सुरू केली आहे. राजीव प्रताप रुढी हे सध्या महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी आहेत. मात्र ही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेऊन गुजरातचे गृहमंत्री तथा नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांच्याकडे दिली जावी, असा भाजपातील वरिष्ठ नेत्यांचा सूर आहे. नरेंद्र मोदींची लाट निर्माण करणे, लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे नियोजन करणे यासह मोदींच्या अनुपस्थितीत गुजरातची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्‍या अमित शहांच्या भरघोस कामगिरीने महाराष्ट्रातील भाजपा नेते चांगलेच प्रभावित झाले आहेत. शहांकडे महाराष्टÑ भाजपाची सूत्रे दिल्यास विधानसभेतही यश मिळविता येऊ शकते, भाजपाच्या जागा वाढवून मुख्यमंत्रीपदही मिळविता येऊ शकते, असा विश्वास या नेत्यांना वाटू लागला आहे. मात्र त्यासाठी त्यांना अमित शहांचे नेतृत्व हवे आहे. भाजपाच्या गोटातून अमित शहांसाठी आतापासूनच जोर लावला जात आहे. अमित शहा यांनी गुजरातमधील सर्व २६ जागांवर भाजपाचे खासदार निवडून आणले आहेत. मोदींच्या प्रचार प्रसाराची पडद्यामागील सर्व सूत्रे त्यांच्याकडे होती. मोदींच्या दिल्लीकडे निघालेल्या रथाचे सारथी शहा होते. राज्यात निवडून आलेल्या युतीच्या वरिष्ठ खासदारांमध्ये एकीकडे मंत्रीमंडळात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा लागलेली असताना भाजपाचे स्थानिक नेते मात्र विधानसभेच्या व्युहरचनेच्या तयारीला लागले आहेत.