शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By admin | Updated: June 18, 2017 12:50 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 -  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या सर्चेचा सविस्तर तपशील अद्याप आलेला नसला तरी सरसंघचालक मोहन भागवत किंवा डॉ. स्वामिनाथन यांना रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी शहांकडे केल्याचे समजते. 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज सकाळीच मातोश्रीवर दाखल झाले होते. अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हेसुद्धा मातोश्रीवर आले होते. ठाकरे आणि शहा यांच्यात होणाऱ्या भेटीदरम्यान राष्ट्रपती निवडणूक तसेच इतर विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवल्याचे वृत्त आहे. तसेच भागवतांच्या नावाला पर्याय म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव सुचवण्यात आले आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेत सहभागी करून घेण्यात आले नाही. 
 काल  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना  अमित शहा म्हणाले "सर्वच मतदारसंघांमध्ये आपली ताकद वाढवा, असे मी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतरांनाही सांगितले होते." देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र तीन दिवसांपूर्वीच ते मध्यावधीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधले असता शहा म्हणाले की, "मध्यावधी निवडणूक होणार, असे मुख्यमंत्र्यांनी कुठेही म्हटलेले नव्हते. उद्या मध्यावधी झालीच तर आम्ही लढू आणि जिंकूच. पळून थोडीच जाणार! असे त्यांनी सांगितले.