शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमित देशमुख यांना कोर्टाचा दिलासा

By admin | Updated: January 23, 2017 04:42 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या, गेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्या, गेल्या निवडणुकीत लातूर मतदारसंघातून राज्य विधानसभेवर झालेल्या निवडीस आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली आहे.सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले अमित देशमुख प्रचंड बहुमताने विजयी झाले होते. त्यांच्याकडून परभूत झालेले आणि अवघी ४०० मते मिळून अनामत रक्कमही जप्त झालेले अपक्ष उमेदवार अण्णाराव गोविंदराव पाटील यांनी देशमुख यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या वर्षी १८ जुलै रोजी पाटील यांची याचिका फेटाळली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चाला २८ लाख रुपयांची कमाल मर्यादा ठरलेली आहे. असे असूनही अमित देशमुख यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून, या मर्यादेहून कितीतरी जास्त खर्च करून निवडणुकीत गैरमार्गांचा अवलंब केला, असा पाटील यांचा आरोप होता, परंतु पाटील यांनी केवळ असे प्रतिपादन करण्याखेरीज आपल्या आरोपाच्या पुष्ठ्यर्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, असे उच्च न्यायालयाने नमूद केले होते. या निकालाविरुद्ध पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली. तेथेही न्या. रंजन गोगोई व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने पाटील यांचे अपील फेटाळले. उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास आम्हाला कोणतेही कायदेशीर व वैध कारण दिसत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशमुख यांच्या वतीने ज्येष्ठ वकील के. के. वेणूगोपाळ व अ‍ॅड. दिलीप तूर यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)