लातूर : अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन अधिक उग्र होत असून, लातूरमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्र्यांना जिलत फिरकू न देण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यानंतर सायंकाळी 4 वाजता बार्शी रोडवर राज्यमंत्री अमित देशमुख यांचा ताफा अडविण्यात आला़ यावेळी पोलिसांनी 15 कार्यकत्र्याना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली़
धनगर समाजाच्या कार्यकत्र्याची मंगळवारी लातूरमध्ये बैठक झाली़ त्यानंतर सायंकाळी 4 च्या सुमारास अमित देशमुख विमानतळाकडे जात असताना कार्यकत्र्यानी त्यांचा ताफा रोखला़ यावेळी कार्यकत्र्यानी त्यांना धनगर समाजाच्या मागणीबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितल़े
सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला़ यावेळी राज्यमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री समाजाच्या मागणीबद्दल सकारात्मक आहेत़ ते लवकरच याबाबतीत निर्णय घेतील़ वाटल्यास येथील कार्यकत्र्यानी मुंबईला यावे, आपण स्वत: त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांना भेटून मागणीबाबत पाठपुरावा करु, असे आश्वासनही राज्यमंत्री देशमुख यांनी दिल़े (प्रतिनिधी)