शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अमिन यांची पदोन्नती नऊ महिने का रखडली?

By admin | Updated: May 18, 2015 04:36 IST

काळबादेवीमधल्या गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेत शहीद झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर अमिन यांच्या कुटुंबीयांनी अमिन यांची पदोन्नती

मुंबई: काळबादेवीमधल्या गोकूळ हाऊस इमारतीच्या दुर्घटनेत शहीद झालेले अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर अमिन यांच्या कुटुंबीयांनी अमिन यांची पदोन्नती नऊ महिने का रखडली? असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित करत नियमांना धरून पदोन्नतीच्या द्या, असे म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून रविवारी देण्यात आलेल्या धनादेशात काही तांत्रिक चुका झाल्या. परिणामी त्यांना सुधारित धनादेश प्रदान करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.महापौर स्नेहल आंबेकर आणि सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिवंगत सुधीर अमिन यांच्या रविवारी कुटुंबीयांनी चेंबूर येथील अग्निशमन दल वसाहतीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिवाय कुटुंबीयांचे सांत्वन करत मदतही देऊ केली. यावेळी अमिन यांची उपप्रमुख अग्निशमन अधिकारी या पदावरील पदोन्नती ९ महिने का रखडवली? असा सवाल त्यांच्या पत्नी शर्मिला अमिन यांनी उपस्थित केला. कुटुंबाला मिळणारी नुकसानभरपाई पदोन्नतीच्या नियमांना धरुन का दिली जात नाही? असेही त्या म्हणाल्या. शिवाय अमिन यांना शहीद म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यानच्या काळात अमिन कुटुंबीयांनी पालिकेकडून प्रदान करण्यात आलेला धनादेश स्वीकारला नसल्याच्या वृत्ताने पालिकेचे धाबे दणाणले. मात्र त्यानंतर काही वेळातच प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. कुटुंबीयांना देण्यात आलेल्या धनादेशात काही तांत्रिक चुका होत्या. कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सुधारित धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. शिवाय कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबतही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)