शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'आमीन सायानींचा आवाज पुढील कित्येक पिढ्यांना आठवणीत राहील'; सुधीर मुनगंटीवारांनी वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2024 15:08 IST

त्यांच्या आवाजातील 'बहनो और भाईयो' आवाजाची साद आजही अनेक रसिक श्रोत्यांच्या कानामध्ये गुंजते आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली. 

मुंबई: अनेक पिढ्यांवर आपल्या सुरेल आवाजाची मोहिनी घालणाऱ्या आणि लाखो-कोट्यवधी रसिकांना खिळवून ठेवणारे  ज्येष्ठ निवेदक आणि आवाजाचे जादूगार आमीन सयानी यांचे निधन प्रत्येक रसिकांसाठी दुःखदायक आहे. त्यांचा आवाज पुढील कित्येक वर्ष रसिकांच्या कानात गुंजत राहील आणि ही मोहिनी कायम राहील." अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमीन सायानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या आवाजाची जादू चौफेर पसरवणाऱ्या या ख्यातनाम निवेदकाचे आज निधन झाले. त्याबद्दल सहसंवेदना व्यक्त करताना मंत्री मुनगंटीवार शोकसंदेशात म्हणाले की, "या महान निवेदकाचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याचे भाग्य मला नुकतेच लाभले; त्यावेळी त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारता आल्या; ती भेट कायम माझ्या स्मरणात राहील. रेडिओ सिलोनच्या माध्यमातून 'बिनाका गीतमाला' कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली. त्यावेळच्या गाण्यांचा त्यात जेवढा सहभाग होता, तेवढाच सहभाग अमीन भाईंच्या आवाजाचा होता. 

बिनाका गीतमाला या हिंदी चित्रपटातील टॉप फिल्मी गाण्यांचा साप्ताहिक कार्यक्रमाचे लाखो श्रोते होते. बिनाका गीतमाला १९५२ ते १९८८ पर्यंत रेडिओ सिलोनवर प्रसारित करण्यात आला आणि नंतर १९८९ मध्ये ऑल इंडिया रेडिओ नेटवर्कच्या विविध भारती सेवेमध्ये स्थलांतरित झाली जिथे त्याचे प्रसारण १९९४ पर्यंत चालले होते. हा भारतीय चित्रपट गाण्यांचा पहिला रेडिओ काउंटडाउन शो होता. भारतातील सर्वात लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. हा कार्यक्रम लोकप्रिय करण्यात अमिनभाईंच्या आवाजाचा मुख्य सहभाग होता. त्यांच्या आवाजातील 'बहनो और भाईयो' आवाजाची साद आजही अनेक रसिक श्रोत्यांच्या कानामध्ये गुंजते आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार