शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधिनीबाबतचे आक्षेप गैरसमजुतीवर आधारित

By admin | Updated: August 12, 2015 02:32 IST

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन येथील प्रशिक्षण केंद्रात अलीकडेच झालेल्या शिक्षण विभागाच्या कार्यशाळेचे निमित्त करून काही राजकीय मंडळींनी व्यक्त केलेली भडक व बेजबाबदार

मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन येथील प्रशिक्षण केंद्रात अलीकडेच झालेल्या शिक्षण विभागाच्या कार्यशाळेचे निमित्त करून काही राजकीय मंडळींनी व्यक्त केलेली भडक व बेजबाबदार विधाने गैरसमजुतीच्या आधारावर केलेली असून खळबळ उडवून देणे हाच त्यामागील हेतू असल्याचे मत प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे यांनी व्यक्त केले.‘शिक्षण खात्याच्या कारभारात संघाची लुडबुडह्ण या शीर्षकाखाली लोकमतच्या ८ आॅगस्ट रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण देताना साठे म्हणतात की, म्हाळगी प्रबोधिनीची ओळख वैचारिक संस्था अशी असून विविध राजकीय पक्षातर्फे त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सबलीकरणाकरिता प्रशिक्षणाचे कार्य गेली अनेक वर्षे सुरु आहे. भाजपाच्या विरोधात असलेल्या काही विचारवंतांनीही प्रबोधिनीचे काम पाहून प्रशंसा केली असून संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक-सोशल कौन्सिलने विशेष सल्लागार संस्थेचा दर्जा दिला आहे. मात्र काही विचारांशी वैचारिक अस्पृश्यता मानणाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यशाळेचा विपर्यास करून संस्थेवर केलेली टीका अन्यायकारक आहे. (प्रतिनिधी)