शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालाड—कांदिवलीतील आंबेडकर अनुयायींचे मोर्चे

By admin | Updated: July 4, 2016 02:32 IST

आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी मालाड—कांदिवलीमध्ये आंबेडकर अनुयायींनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला.

मुंबई : आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी मालाड—कांदिवलीमध्ये आंबेडकर अनुयायींनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. मोर्चेकऱ्यांनी या वेळी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या अटकेची मागणी केली. पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे पदाधिकारी नागसेन सोनारे यांच्या कांदिवलीतील घरावर मोर्चा नेण्यात आला.मोर्चामध्ये समतानगर पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल, साध्या वेशातील पोलीस आणि सहायक पोलीस आयुक्त सुभाष वेळे यांची उपस्थिती होती. या मोर्चाचे आयोजन भारिप बहुजन महासंघ कांदिवली, दहिसर तालुका भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध लेणी संवर्धन समिती आदींनी केले होते; तर दुसरीकडे मालाड येथे गेट नंबर ८ अंबूजवाडी येथून गेट नंबर ५ मालवणी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. रत्नाकर गायकवाड यांचे निषेध करणारे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. गायकवाड यांना अटक करण्याच्या या मागणीचे निवेदन मालवणी पोलिसांना देण्यात आले. हा मोर्चा बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीचे मालाड तालुकाध्यक्ष सुनील खरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. गायकवाड यांना अटक न झाल्यास मंत्रालयात घुसून आंदोलनाचा इशारा बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीचे अध्यक्ष श्याम झळके यांनी दिला. (प्रतिनिधी)३५ जण समतानगर पोलिसांच्या ताब्यातकांदिवलीत काढलेल्या मोर्चातील ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले. यात महिलांचाही समावेश आहे. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर समज देत या सर्वांना सोडून देण्यात आल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.