शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींच्या ‘अँटालिया हाऊस’ला आग

By admin | Updated: July 11, 2017 05:37 IST

दक्षिण मुंबईतील अँटालिया हाऊस’ या टोलेजंग टॉवरच्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवर आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या दक्षिण मुंबईतील अँटालिया हाऊस’ या टोलेजंग टॉवरच्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवर आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत काही वेळातच आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून किरकोळ साहित्य भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा असलेल्या मुकेश अंबानी यांचे गावदेवी येथील अल्ट्रामाऊंट रोडवर २७ मजली व ५७० फूट उंच अँटालिया हाऊस आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अँटालिया हाऊसच्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवर आग लागली. सुरक्षारक्षकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवित अग्निरोधन यंत्राचा वापर केला. अग्निशमन दलाचे जवानही काही वेळेतच तेथे पोहचले. त्यांनी या टॉवरचा विद्युतपुरवठा बंद करून काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. इमारतीच्या ६व्या मजल्यावर गॅरेज असून येथे १६८ वाहनांच्या पार्किंगची क्षमता आहे. मात्र सर्वाधिक सुरक्षित व अद्यावत यंत्रणा असलेल्या या इमारतीला आग लागल्यामुळे काहीकाळ खळबळ उडाली.