शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अमराठी कर्मचाऱ्यांना मिळणार मराठीचे धडे

By admin | Updated: April 29, 2015 01:20 IST

शासकीय कार्यालयातील अमराठी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मराठी भाषेची जाण व्हावी, कामकाजाला गती यावी आणि मराठी भाषिकांशी त्यांची संवादाची दालने खुली व्हावीत,

पुणे : शासकीय कार्यालयातील अमराठी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मराठी भाषेची जाण व्हावी, कामकाजाला गती यावी आणि मराठी भाषिकांशी त्यांची संवादाची दालने खुली व्हावीत, यासाठी त्यांना मराठीचे धडे देण्याचा अभिनव उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मराठी प्रशिक्षण वर्गाचा ‘श्रीगणेशा’ होणार असून, पहिल्या टप्प्यात रेल्वे प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मराठीचे पाठ दिले जाणार आहेत. लवकरच आॅनलाईन प्रशिक्षण सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल्वे भरतीमध्ये अमराठी भाषिकांच्या भरतीवरून नेहमीच ‘रणकंदन’ माजते. मराठी लोकांना भरतीदरम्यान नेहमीच डावलले जात असल्यावरून आंदोलनचा पवित्रा घेणाऱ्या ‘मनसेने’चा इतिहासही नवा नाही. आज पाहिले तर केंद्राच्या बहुतांश महत्त्वपूर्ण विभागांची मध्यवर्ती कार्यालये ही प्रामुख्याने मुंबईतच आहेत. या विभागांमध्ये बाहेरून आलेल्या कर्मचारी-अधिकारी वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई कॉस्मॉपॉलिटीन असल्याचे सांगितले जात असले तरी त्या मातीशी ‘मराठी’ची नाळ ही घट्टपणे जुळलेली आहे. सर्वच शासकीय विभागांचे कामकाज हे मराठीमध्येच होत असल्यामुळे या विभागांमध्ये काम करणाऱ्या अमराठी भाषिक कर्मचारी-अधिकारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे.या प्रशिक्षण वर्गासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. त्यानुसार हा अभ्यासक्रम निर्मित करण्यात आला आहे. एका शिक्षकाची नियुक्ती करून चर्चगेट येथील सभागृहात त्यांना मराठीचे पाठ देण्यात येणार आहेत. तब्बल तीन महिने हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात रेल्वे विभागातील वर्गानुसार १०० लोकांना मराठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हा वर्ग चालणार असून, ज्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष वर्गाला येणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी आॅनलाईन प्रशिक्षण देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)४केवळ इंग्रजी, हिंदीवरच प्रभुत्व असल्याने त्यांची कार्यालयीन कामकाज आणि मराठी भाषिकांशी संवादाची वीण बांधताना मोठी पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. ४याच जाणीवेतून राज्य मराठी विकास संस्थेने अमराठी भाषिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना मराठीचे पाठ देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती संस्थेचे मराठी विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सोलनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.