शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी पार्टीतील वादाला अमरसिंह जबाबदार- अबू आझमी

By admin | Updated: October 25, 2016 23:06 IST

समाजवादी पार्टीत महाभारत उफाळून आलं असतानाच आता अबू आझमींनीही या वादात उडी घेतली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - समाजवादी पार्टीत महाभारत उफाळून आलं असतानाच आता अबू आझमींनीही या वादात उडी घेतली आहे. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरसिंह यांच्यावर शरसंधान केलं आहे. यादव कुटुंबात सुरू असलेल्या वादाला अमरसिंहच जबाबदार असल्याचा आरोप अबू आझमींनी केला आहे. पक्ष फुटण्यापूर्वीच मुलायमसिंह यादव यांनी पक्षाला सावरण्याची गरज व्यक्त करत अखिलेश यादव यांची तळी उचलली आहे. अखिलेश यांच्या नेतृत्वाखालीच समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.पक्षामध्ये फूट पडण्यापासून रोखण्यासाठी मी मुलायम सिंहाना विनंती करतो. अखिलेश यादव हे पक्षाचे अत्यंत योग्य नेतृत्व करत आहेत. ते फक्त कोणाचे ऐकत नाही. मुलायमसिंह यांनी एकदा पक्षांतर्गत मतदान घेऊन अमरसिंहांबाबत मत आजमावून पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.मुलायमसिंह यादव हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वातच पक्ष फोफावला. मुलायम सिंहांशिवाय समाजवादी पक्षाची कल्पनाच होऊ शकत नाही. मात्र अमरसिंह यांनी पक्षात फूट पाडण्याचे ठरवल्यानंतरही मुलायमसिंह यांनी याविरोधात ब्र काढला नाही, अशी खंत व्यक्त केली. एका व्यक्तीने नोव्हेंबर महिन्यातच ट्विट करत अखिलेश हे मुख्यमंत्री पदावर दीर्घकाळ राहणार नसल्याचे म्हटले होते. म्हणजे अनेक दिवसांपासून हा कट रचण्यात आला होता. परंतु मुलायमसिंहांना ही गोष्ट समजली नाही, असं म्हणत अमरसिंहांवर निशाणा साधला आहे.