शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

अमेरिकन कुलगुरू बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:40 IST

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना ते अमेरिकन नागरिक असल्याचे सिद्ध झाल्याने कुलपती व राज्यपाल

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना ते अमेरिकन नागरिक असल्याचे सिद्ध झाल्याने कुलपती व राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पदावरून आज तत्काळ बडतर्फ केले. डॉ. दाणी यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ १३ आॅगस्ट रोजी संपणार असून त्याच्या केवळ १५ दिवस आधी त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.डॉ. दाणी यांची १३ आॅगस्ट २०१२ रोजी नियुक्ती केली होती. गेल्या वर्षी तत्कालीन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी डॉ. दाणींविरुद्ध अमेरिकन नागरिकत्व व इतर मुद्द्यांवरील तक्रारींची माहिती राज्यपालांना दिली. त्यानंतर चौकशीची चक्रे फिरली. डॉ. दाणी अमेरिकेचे नागरिक आहेत काय हे जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी राज्याचे महाधिवक्ते, राज्याचा विधी व न्याय विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाची मते मागविली. त्यात ते अमेरिकन नागरिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज बडतर्फीची कारवाई करण्यात आली.केवळ नागरिकत्वाबाबतच नव्हे तर डॉ. दाणी यांच्याविरुद्ध अन्य मुद्द्यांवरही काही कार्यकारी परिषद सदस्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. आता दाणी यांच्या बडतर्फीमुळे सदर तक्रारींबाबत राज्यपाल काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. राजभवनातून जे प्रसिद्धिपत्रक काढण्यात आले त्यात ‘विदेशी’च्या मुद्द्यावरून डॉ. दाणी यांच्याविरुद्ध कारवाई होणार का याचा उल्लेख नाही. या विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.१५ दिवस आधी बडतर्फी करून काय साधले?डॉ. दाणी अमेरिकन नागरिक असल्याचे त्यांच्या मुलाखतीवेळी समोर आले नव्हते का, विद्यापीठ कायद्यानुसार आपण भारतीय नागरिक असल्याबाबतचे पत्र नियुक्तीच्या एक वर्षात दिले होते की नाही, त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या केवळ १५ दिवस आधी बडतर्फी करून काय साधले, अशा शंका आता उपस्थित झाल्या आहेत.याबाबत डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या प्रतिक्रियेसाठी त्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.