शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखाली बेकायदा टपऱ्या कायमच

By admin | Updated: June 5, 2017 03:06 IST

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी येथे असलेल्या उड्डाणपुलाखाली बेकायदा टपऱ्या मुळे उड्डाण पुलालाच धोका निर्माण झाला

सुरेश काटे। लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी येथे असलेल्या उड्डाणपुलाखाली बेकायदा टपऱ्या मुळे उड्डाण पुलालाच धोका निर्माण झाला असून अपघातांचीही शक्यता वाढली आहे. तलासरीच्या आमसभेत या टपऱ्यांवर चर्चा होऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते. तलासरी उड्डाण पुला खालच्या टपऱ्या काढण्या बाबत चार वर्षा पूर्वी खासदार चिंतामण वनगा यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता परंतु टपऱ्या न काढताच त्या काढल्याचा खोटा अहवाल अधिकाऱ्यांनी सादर करून टपऱ्या ना अभय दिले होते. डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार पास्कल धनारे यांनी या टपऱ्या काढण्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता तत्कालीन जिल्हाधिकारी बांगर यांनी एन.एच. ए. चे अधिकारी अगरवाल यांना टपऱ्या काढण्याचे आदेश दिले पण गेले वर्षभर त्यांनी या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तहसीलदारांनीही या टपऱ्या नॅशनल हायवेच्या अखत्यारीत येत असल्याने त्या काढण्या बाबत त्यांना पत्र दिले तरी सुद्धा टपऱ्या कायम आहेत. तलासरी उड्डाण पुलाखाली असलेल्या टपऱ्यांमध्ये अवैध धंदे चालत आहेत दारू पासून गुटक्या पर्यंत सगळे सर्रास मिळते , तसेच चायनीजच्या गाड्या वर घरगुती सिलेंडरचा वापर, अश्लील चित्रिफती मोबाईल मध्ये भरून देणारी दुकाने, या मोबाईलच्या टपऱ्या व तेथे उभी राहणारी टपोरी तरु णांची टोळकी व त्यांच्याकडून पुला खाली बसची वाट बघत असणाऱ्या आदिवासी तरुणी , महिला, व विद्यार्थिनीची होणारी छेडछाड यामुळे या टपऱ्या हटविण्याची मागणी नागरिकांनी केली असून आमदार व खासदारांनीही पत्र व्यवहार केला आहे तरीही टपऱ्या अ‍ॅथॉरिटीच्या आशिर्वादामुळे कायम आहेत.येत्या दोन दिवसात टपऱ्या काढण्याची कारवाई न केल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. -आमदार पास्कल धनारेटपऱ्या मुळे पुला खाली वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याने टपऱ्या काढण्याची कारवाई करावी असे पत्र एन एच ए ला दिले आहे. - बी.के.नाईक, पोलीस निरीक्षकटपऱ्या नॅशनल हायवेच्या अखत्यारीत येत असल्याने त्या काढण्याची कारवाई करण्याचे पत्र त्यांना दिले आहे. - विशाल दौंडकर, तहसीलदारटपऱ्या काढण्याची कारवाई तात्काळ करतो.-दिनेश अगरवाल, अभियंता एन एच ए, - शशी भूषण, पी.डी. एन एच ए