शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

घराचं स्वप्नं सोबत घेऊनच रुक्सानानं केलं अलविदा!

By admin | Updated: April 28, 2015 23:47 IST

सोमवारी तालुक्याला बसलेल्या वादळाने हसोळ मुस्लीमवाडीतील मीर कुटुंबावर काळाचा घाला घातला आणि सारेच हेलावून गेले.

राजापूर : एकीकडे मंद नवरा तर दुसरीकडे दोन चिल्लीपिल्ली... यांच्यासाठी खस्ता खात नवीन घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगून वावरणाऱ्या रुक्साना सुलेमान मीर ही चक्रीवादळाच्या तडाख्यात घरावर वडाचे झाड कोसळून त्याखाली सापडून मृत्युमुखी पडली आणि संपूर्ण घराचा आधारच कोसळून पडला. त्या घटनेने तिचा पती सुन्न झालाच तर दोन्ही मुलेही दु:खसागरात बुडाली. सोमवारी तालुक्याला बसलेल्या वादळाने हसोळ मुस्लीमवाडीतील मीर कुटुंबावर काळाचा घाला घातला आणि सारेच हेलावून गेले. मुख्य रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर दगड धोंडे व चढ अशी पायवाट असणाऱ्या डोंगराळ भागात सुलेमान दाऊद मीर व त्यांचे भाउ अकबर दाऊद मीर आपल्या कुटुंबीयांसमवेत राहतात. घरामध्ये एकूण नऊ माणसे असून सुलेमान यांची पत्नी रुक्साना मोठी मुलगी शाबीरा, मुलगा अब्रार त्यांचे भाऊ अकबर, भावजय जायदा व त्यांची तीन मुले अलमान, अजमिन, अफान असे एकत्र राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपले राहते घर पाडून त्याजागी नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तेथूनच लगत असणाऱ्या त्यांच्याच जागेत निवासाची पर्यायी व्यवस्था करुन ही दोन्ही कुटुुंबे राहत होती.स्वत: सुलेमान मीर हे काहीसे मंद असल्याने त्यांची पत्नी रुक्साना हीच कुटुंबाचा आधारस्तंभ होती, तर तिचे दीर अकबर आणि त्यांचे कुटुंंब त्यांना साथ देत होते. नवीन घराचा पक्का पाया बांधून लवकरच पुढील बांधकामदेखील सुरु होणार होते. मात्र, सोमवारी रात्री आलेल्या चक्रीवादळाचा फेरा साक्षात मृत्यूचे पाश घेऊनच आला आणि त्याने सुलेमान यांची पत्नी रुक्साना हिच्यावर घाला टाकला. घरामागील दरवाजामध्ये रुक्साना उभ्या असतानाच नजीकच असणारे वडाचे झाड चक्रीवादळाने घरावर पडले आणि काही क्षणातच त्याखाली संपूर्ण कुटुंब सापडले. रुक्सानाला तर एवढा मार बसला की ती काही क्षणातच गतप्राण झाली. या अपघातात अकबर मीर यांची दोन मुले अजमिन व अलमान ही गंभीर जखमी झाली. मात्र, घडलेल्या घटनेची वेळीच कल्पना आल्याने अकबर मीर व अन्य मंडळीनी तत्काळ घराबाहेर धाव घेऊन आपला जीव वाचवला. मुसलमानवाडीपासून एका बाजूला डोगराच्या माथ्यावर हे घर असून वरुन कोणीतरी ओरडत आहे हे पाहून खाली असलेल्या अनेक ग्रामस्थांनी वर धाव घेतली त्यावेळी दोन मुले जखमी अवस्थेत तर एक महिला निपचित पडलेली त्यांना आढळून आली. या वादळात वीज पुरवठादेखील खंडित झाल्याने मदत कार्यात मोठा अडथळा येत होता.तरीदेखील न डगमगून जाता धावून आलेल्या ग्रामस्थांनी जखमी झालेल्या दोन्ही मुलांना पुढील उपचारार्थ दोन किलोमीटरची अवघड पायवाट तुडवीत राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र दोन्ही मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व जीवीताला धोका असल्याने त्यांना रत्नागिरीतील परकार रूग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एकीकडे सुलेमान यांचा संसार उध्वस्त झाला असतानाच दुसरीकडे भावाची दोन मुले मृत्युशी झुंज देत आहेत. (प्रतिनिधी)घरावर वडाचे झाड पडून मयत झालेल्या रुक्साना सुलेमान मीर यांच्या मृतदेहाचे राजापूर ग्रामीण रुग्णलयात शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी दुपारी दफन विधी करण्यात आला.राजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी बुधवार सकाळपासून या आपत्तीग्र्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली आहे, तर आपल्या सर्व ग्रामसेवकांना तात्काळ सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.