शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यातून दोनच दारुच्या बाटल्यांना परवानगी

By admin | Updated: November 18, 2016 18:35 IST

दारू बाळगण्याचा परवाना असलेल्यांना आता महिन्यातून फक्त दोनच बाटल्या बाळगता येतील. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती

आॅनलाइन लोकमत

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) दि. १८- दारू बाळगण्याचा परवाना असलेल्यांना आता महिन्यातून फक्त दोनच बाटल्या बाळगता येतील. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव व्ही.राधा यांनी दिली. अवैध दारू विक्री विरोधातील कायद्याचा मसुदा तयार होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत अनेक सूचना केल्या आहेत. या मसुद्याबाबत चर्चा करण्यासाठी व्ही. राधा शुक्रवारी राळेगणसिध्दीत आल्या होत्या. अण्णा हजारे, व्ही.राधा, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची सुमारे तासभर याप्रश्नी चर्चा झाली. पूर्वी दारू पिणाऱ्या परवानाधारकास महिन्याला दारूच्या बारा बाटल्या बाळगण्याची परवानगी होती. अण्णा हजारे यांनी त्यास आक्षेप घेतला होता. या परवानगीने ग्रामीण भागात घराघरात दारूची दुकाने होतील, अशी भीती अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करून यात बदल करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागाच्या राज्य सचिव व्ही.राधा यांच्यात बैठकही झाली होती. त्यानंतर फक्त दोन बाटल्याच बाळगता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. सचिव व्ही.राधा म्हणाल्या, अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अवैध दारूविक्री विरोधात नवा कायदा करण्यात येत आहे. अण्णांच्या सूचनेनुसार ग्रामसभेला कायद्याने अधिकार देऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात येईल. अवैध दारूविरोधात कारवाई करण्याचे अधिकार ग्रामसुरक्षा दलाला देण्यात येणार आहेत. दारूविक्री करणाऱ्यांविरोधात महिलांनी थेट माझ्याकडेच तक्रार करावी. आम्ही तातडीने कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातून राज्यातील व्यसनमुक्ती अभियानाची चळवळराज्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये दारू, तंबाखू, गुटखा विरोधात व्यसनमुक्ती अभियान चळवळ राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ नगर जिल्ह्यातूनच होणार असल्याची माहिती व्ही.राधा यांनी दिली.