शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीतील भूखंडांचे वाटप

By admin | Updated: February 17, 2016 03:18 IST

महाराष्ट्राने दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठीची (डीएमआयसी) भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली असून, औद्योगिक भूखंडांचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे

मनीष गजभिये ,  मुंबईमहाराष्ट्राने दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठीची (डीएमआयसी) भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली असून, औद्योगिक भूखंडांचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांनी मंगळवारी येथे दिली. ‘औद्योगिक कॉरिडॉर’वरील चर्चासत्रात ते बोलत होते. डीएमआयसी प्रकल्पातील राज्यांपुढे भूसंपादन हे सर्वात मोठे आव्हान आहे. तथापि, महाराष्ट्राने औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन येथे शेतकऱ्यांशी कोणताही संघर्ष न होऊ देता भूसंपादन केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी स्वेच्छेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) दिल्या. सरकारनेही ‘रेडी रेकनर’ दराच्या पाच पट अधिक भाव त्यांना दिला. शेंद्रा-बिडकीन परिसरात सर्व चार हजार हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामाचे आदेशही देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधा उभारण्याचे कंत्राट शापूरजी पालोनजी कंपनी लिमिटेडला देण्यात आले आहे. औद्योगिक भूखंडांची विक्री करण्याची प्रक्रिया एप्रिल-मेमध्ये सुरू होईल. सिंगापूरशी करारऔरंगाबाद हे पाणीटंचाई क्षेत्र आहे. त्यातच आगामी प्रकल्पांनाही पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. ही बाब डोळ्यासमोर ठेवून पाण्यावर प्रक्रिया व त्याचा फेरवापर यासंदर्भात सिंगापूर सरकारशी सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. सिंगापूर सरकार पालिकेला पाण्यावरील प्रक्रिया व पाण्याचा फेरवापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण लवकरच सुरू होईल, असेही चंद्रा म्हणाले. बंगळुरू-मुंबई आर्थिक कॉरिडॉर सोलापूर आणि कोल्हापूरच्या सुपीक जमिनीतून जात होता. त्यामुळे हा कॉरिडॉर तेथून ५० कि. मी. दूर सरकवून दुष्काळप्रवण भागातून नेण्याची तरतूद केली आहे. डीएमआयसी प्रकल्पाच्या अंमल बजावणीमुळे येत्या १५ ते २० वर्षांत औरंगाबाद औद्योगिक विकासात पुणे शहराच्याही पुढे जाईल. शेतकरी आता त्यांच्या जमिनी देण्यास तयार झाले असल्यामुळे सध्याच्या दराने जमिनी खरेदी करणे सुलभ झाले आहे. पायाभूत सुविधांच्या विकासानंतर जमिनीचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे संपूर्ण डीएमआयसी प्रकल्पासाठी किती जमीन लागणार आहे याबाबत स्पष्टता असायला हवी, असे चंद्रा म्हणाले.