शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरास दोन महिन्यांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 03:52 IST

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी राजकुमार दुबे याला वर्तकनगर पोलिसांनी मुंबईतून अटक केली.

ठाणे : लोकमान्यनगर येथील संजय यादव (३०) याला बेदम मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांच्या टोळीपैकी राजकुमार दुबे याला वर्तकनगर पोलिसांनी मुंबईतून अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याच्या साथीदारांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यांपासून दुबे पोलिसांना हुलकावणी देत होता. पोलिसांची चाहूल लागताच आपल्या साथीदारांसह तो पलायन करीत होता. मात्र, पोलीस सतत मागावर असल्यामुळे त्याने सांताक्रूझला घर घेतले. तो तिकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सांताक्रूझमधील वाकोला येथील गोळीबार झोपडपट्टीतून सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, जमादार विलास भोसले, हवालदार हेमंत मोरे, भागवत दहिफाले आणि भूषण गावडे यांच्या पथकाने त्याला ११ मे रोजी अटक केली. जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी तसेच घराचे बांधकाम केले म्हणून १० हजारांची खंडणी उकळण्यासाठी सुनील तिवारी, सुनील गवळी आणि दुबे यांच्यासह पाच जणांच्या टोळीने संजयला १० मार्च २०१६ रोजी मारहाण करून डोक्यात खलबत्त्याच्या दांड्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार लोकमान्यनगर पाडा क्रमांक-४ भागात घडला होता. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यापैकी राजकुमार हा एकमेव आरोपी दोन महिन्यांनी पोलिसांच्या हाती लागला असून चौघे अद्यापही फरार आहेत. यातीलसंतोष तिवारीवर तीन गुन्हे, तर सुनीलवर अनेक गुन्ह्यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद आहे.