शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

नाशिकमधील शेतात केले पैशांचे वाटप

By admin | Updated: July 2, 2016 04:25 IST

नऊ कोटी १६ लाखांच्या रकमेचे नाशिकमधील एका शेतात ६० आणि ४० टक्क्यांच्या फॉर्मुल्याने काही तासांतच वाटप झाले.

पंकज रोडेकर,

ठाणे- चेकमेट कंपनीत लुटलेल्या नऊ कोटी १६ लाखांच्या रकमेचे नाशिकमधील एका शेतात ६० आणि ४० टक्क्यांच्या फॉर्मुल्याने काही तासांतच वाटप झाले. प्रत्येकाला पैसे गोणीत भरून देण्यात आले आणि त्यासाठी १७ गोण्यांचा वापर केला गेल्याचे तपासात आढळून आले. पैसेवाटप झालेल्या शेतातच एक कोटी आठ लाखांची रोकड सापडली. आणखी एका फरार आरोपीच्या घरात एक कोटी ९५ लाख रुपये सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कंपनीतील आजी-माजी कर्मचारी, नाशिकमधील काही जणांची मदत घेत १५ जणांनी ठाण्यात २८ जूनला हा दरोडा टाकला. दरोडेखोरांनी ड्रमसह कचऱ्याच्या पेट्यांत रक्कम भरून नेली होती. नाशिकजवळ पोहोचल्यावर त्यांनी लगेचच तिचे वाटप केले. वाडिवरे गावात राहणाऱ्या व सध्या फरार असलेल्या आरोपीच्या शेतात ते आधी पोहोचले. तेथे रकमेचे वाटप करताना त्यांनी आधी ठरवल्यानुसार ६० आणि ४० टक्क्यांचा फॉर्म्युला वापरल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार, वाहनचालकांना ४० टक्के, तर ज्यांनी प्रत्यक्ष दरोडा टाकला, त्यांना ६० टक्के अशी रक्कम वाटली गेली. चेकमेट कंपनीत यापूर्वी दोन वेळा दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या, त्यात साहाय्य करणाऱ्यांनाही या रकमेचा काही वाटा देण्याचे ठरले होते. त्यांनी तोंड उघडू नये, कोणताही पुरावा त्यांच्याकडून मिळू नये, यासाठी त्यांनाही या रकमेतील काही वाटा दिला जाणार असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. दरोड्याची रक्कम ड्रम आणि कचरापेट्यांतून आणली असली, तरी वाटप करताना संशय नको म्हणून हे पैसे प्रत्येकाला गोण्यांमध्ये भरून देण्यात आले. यासाठी १७ गोण्यांचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.अटक केलेल्यांतील नितेश आव्हाड, मयूर कदम यांच्याकडे प्रत्येकी ४० लाख, तर उमेश वाघ याच्याकडे ६० लाखांची रोकड सापडली. उरलेल्या तिघांकडे रक्कम सापडलेली नाही. >मोबाइलचे लोकेशन्स मानकोली दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पाच मोबाइल फोनही चोरले होते. त्यातील एका मोबाइलचे लोकेशन्स मानकोली येथे दाखवले होते. त्यानुसार, अंदाज बांधून दरोडेखोर नाशिकला गेले असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाचा मोर्चा नाशिककडे वळवला होता. तो अंदाज खरा ठरला.आणखी नऊ जण?आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दरोड्यात आणखी किमान नऊ जणांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यातील चौघांची नावे स्पष्ट झाली आहेत. उरलेल्यांची नावेही लवकरच तपासात समोर येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. नाशकात सात-आठ पथके तैनातया गुन्ह्यातील चार जण गोवा आणि तिरुपतीला गेले असल्याची माहिती समजल्याने तेथे पथके रवाना झाली आहेत. तसेच दरोड्याचे नाशिक कनेक्शन लक्षात घेऊन तेथे सात-आठ पथके अद्यापही तैनात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पत्रकार परिषदेवेळीच सापडली रोकडठाण्यात पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत दरोड्याची उकल झाल्याची माहिती दिली जात असतानाच पैसे वाटप झालेल्या शेतातच एक कोटी आठ लाखांची रक्कम सापडल्याची माहिती हाती आली. ती वगळता बाकीची रक्कम आधीच हस्तगत करण्यात आली होती.