शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

युती एकवटली, विरोधक विखुरले

By admin | Updated: February 17, 2016 01:47 IST

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते

पालघर : दि. १६- २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते. त्यातच बविआ, माकप, मनसे, बसपा यांचेही उमेदवारही रिंगणात होते. अशा स्थितीतही शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांनी ४६१५२ मते व ५१५ मतांचे अधिक्य मिळवून विजय मिळविला होता. २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या गावितांना ४५६२७, भाजपाच्या डॉ. गौड यांना ३४१४९ तर बविआच्या मनिषा निमकर यांना २३७३८, माकपाच्या उमेदवाराला ६५००, मनसेला ३१४८, तर बसपाला १९०० मते मिळाली होती. या निकालाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन या पोटनिवडणुकीत भाजपाने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारून युतीच्या मतांची फाटाफूट टाळली होती. त्याचा फायदा युतीला म्हणजे अमित घोडा यांना झाला आणि त्यांचे मताधिक्य ५१५ वरून एकदम २०९८७ वर गेले. एकीकडे युतीची मते एकवटलेली असतांना काँग्रेसने मात्र बविआशी काही समझोता करून ही लढत एकास एक अशी सरळ घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. ते न झाल्यामुळे युती विरोधातील मतांची फाटाफूट झाली. त्याचा परिणाम अमित घोडा यांची मते, मताधिक्य वाढून ते विजयी होण्यात झाला. निमकर जर या लढतीत नसत्या तर त्यांची ३६७८१ मते गावित आणि घोडा यांच्यात विभागली गेली असती अशा स्थितीत कोण विजयी झाले असते हे सांगता येणे कठिण झाले असते. परंतु तसे झाले नाही. १निमकर आणि गावित यांना आपली मते गत निवडणुकीच्या तुलनेत काहीशी वाढली. एवढ्यावरच यावेळी समाधान मानावे लागले आणि विजयश्रीने आपल्याला कशी हुलकावणी दिली ते ही पहावे लागले. जो राजकीय शहाणपणा सेना-भाजपाने दाखविला तो काँग्रेस आणि बविआने दाखविला असता तर या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. या निवडणुकीतील राजकीय व्यूहरचनेत काँग्रेस आणि बविआ कमी पडलेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये व्यक्त होते आहे. २गावित आणि निमकर यांनी जरी मते वाढल्याचा दावा केला असला तरी सत्तेच्या राजकारणात तुलनात्मक मतवाढीपेक्षा जयापजयाला अधिक महत्व असते. याचे भान युती विरोधकांनी राखले नाही. या निवडणुकीत मनसे आणि बविआ यांचे उमेदवार नव्हते. मार्क्सवादी काहीसे निष्प्रभ झालेले त्यामुळे सेना-भाजप, काँग्रेस बविआ हे चारच पक्ष प्रभावी होते. ३जशी सेना-भाजपने एकत्र येण्याची राजकीय धूर्तता दाखविली तशीच धूर्तता काँग्रेस आणि बविआने दाखविली असती तर निश्चितच या निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलले असते. या पुढच्या निवडणुकांत तरी अशी धूर्तता काँग्रेस दाखवेल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.