मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर स्वबळाच्या वल्गना करीत शिवसेनेला बेटकुळ्या दाखविणा:या भाजपा नेत्यांनी अखेर आपली शस्त्रे म्यान केली. आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढविली जाईल, असे सांगत यापुढे स्वबळावर लढण्याची भाषा कोणीही करायची नाही, यावर आजच्या बैठकीत एकमत झाले.
जागावाटपावर चर्चा करण्यासाठी शिवसेना-भाजपा नेत्यांची शुक्रवारी येथील एका हॉटेलात बैठक झाली. बैठकीला भाजपातर्फे एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, रवी भुसारी तर शिवसेनेतर्फे दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन कीर्तीकर, लीलाधर डाके, संजय राऊत उपस्थित होते. दोन्ही पक्षांनी लढविलेल्या, पण एकदाही न जिंकलेल्या जागांची अदलाबदल करण्यावर दोन्ही पक्षांचे नेते राजी झाले. दरम्यान महायुतीची एकत्रित बैठक 28 जुलैला होईल. (विशेष प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या चार घटक पक्षांच्या जागा आधी निश्चित करायच्या आणि उरलेल्या जागांचे वाटप भाजपा-शिवसेनेत करायचे, असेही ठरल्याचे समजते.