शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या डोक्यात सत्ता गेलीय

By admin | Updated: February 28, 2016 03:59 IST

सत्ताधारी भाजपा सरकारवर जनता नाराज असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाकडून देशद्रोह व राष्ट्रभक्तीसारखे मुद्दे बाहेर काढले जात असल्याची टीका राष्ट्रवादी

मुंबई : सत्ताधारी भाजपा सरकारवर जनता नाराज असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाकडून देशद्रोह व राष्ट्रभक्तीसारखे मुद्दे बाहेर काढले जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. सत्ता येते व जाते, त्यामुळे आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवायचे असतात. सत्तेची हवा डोक्यात जाऊ द्यायची नसते, असा टोलाही या वेळी त्यांनी शिवसेना-भाजपा सरकारला लगावला.मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. केंद्रात सत्ता असताना आणि मोठी पॅकेज जाहीर करूनही बिहारमध्ये आणि दिल्लीत भाजपाचा पराभव झाला. पंतप्रधान मोदींच्या लाख कोटींच्या आकड्यांना बिहारची जनता भुलली नाही. आगामी निवडणुका होत असलेल्या राज्यातही पराभव समोर दिसत असल्याने देशात दुहीची किंवा हिंदुत्ववादाची बीजे पेरून भाजपा निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खा. पवार यांनी केला.वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू असून, सत्तेच्या आधारे वेगळ्या विचारांच्या नेत्यांना संपवायचे काम सुरू आहे. सत्ता येताच सत्ताधारी पक्षाचे लोक पोलीस दलावर हल्ला करू लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.हिंदू विरुद्ध मुस्लीम, दलित विरुद्ध अदलित असे वाद निर्माण करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यात पाणी नाही. सरकार लोकांना पिण्याचे पाणी देऊ शकत नाही. मग मराठवाड्यातली लोक जगणार कसे असा सवाल त्यांनी केला. गोमातेला वाचवा म्हणायचे, तिच्या नावाने राजकारण करायचे आणि गोमातेला चारा मात्र द्यायचा नाही, असे सांगत, या सरकारमध्ये गोमातेला चारा द्यायची दानत नसल्याची टीकाही खा.पवार यांनी केली.हैदराबाद विद्यापीठात देशविरोधी कारवाई करणारी टोळी आहे. असे सांगत केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी पत्र लिहून देशविरोधी वागणाऱ्यांवर कारवाई करा असे सांगितले. त्यानुसार रोहित वेमुला आणि त्याच्या मित्रांना होस्टेलमधून बाहेर काढले गेले शिष्यवृत्ती बंद करण्यात आली त्यामुळेच रोहितने आत्महत्या केली असा आरोपही पवार यांनी केला.मेक इन इंडियात जास्त गुंतवणूक मुंबई परिसरात आली. मुख्यमंत्री विदर्भात गुंतवणूक आणू शकले नाहीत., असे सांगत विरोधी पक्षात असताना विदर्भावर अन्याय झाला म्हणून ते ओरडायचे असा चिमटाही त्यांनी फडणवीस यांना काढला. मेक इन इंडियामध्ये सरकारची नियत चांगली नव्हती, नाही तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आग लागली नसती असा टोला त्यांनी लगावला.दोषींना पाठीशी घालणार नाही!परमार प्रकरणाबाबत शरद पवार पहिल्यांदा बोलले. ते म्हणाले, आमचा माणूस दोषी असेल तर मी पाठीशी घालणार नाही. पण परमार यांनी लिहिलेले पत्र सांगत आहे की, परमार आर्थिक अडचणीत होते म्हणून त्यांनी आत्महत्या केली. परमार यांच्या चुकीच्या गोष्टींवर आमच्या नगरसेवकांनी बोट ठेवले तर त्यांना दोषी ठरवून तुरुंगात डांबले जात आहे. हे सुडाचे राजकारण आहे.वेगळ्या विदर्भाच्या ठरावाला पाठिंबा देऊ वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याबाबत बोलताना खा. पवार म्हणाले, महाराष्ट्र एकसंघ राहावा, अशी माझी इच्छा आहे. परंतु वेगळा विदर्भ व्हावा ही तेथील लोकांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी तेथील लोकांच्या इच्छेआड येणार नाही. पण मूठभर लोकांची इच्छा असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. आणा वेगळ्या विदर्भाचा ठराव, आम्ही पाठिंबा देतो. पाहू या काय होते ते. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थीवर्ग अस्वस्थ आहे. आंदोलने केली की त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला जातो. त्यामुळे पक्षाच्या विद्यार्थ्यांनी सावध व्हावे. सरकार तुमच्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करेल, त्यामुळे तुम्ही त्याची तयारी ठेवा. - शरद पवार