शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

युती-आघाडीत सामना टफ

By admin | Updated: September 15, 2014 01:05 IST

जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक रविवारी पार पडली. यात काँग्रेसला ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, भाजप ४ तर शिवसेनेला ३ ठिकाणी यश मिळाले. विधानसभा

पं.स.सभापती निवडणूक काँग्रेस-४ राष्ट्रवादी-२ भाजप-४ शिवसेना-३नागपूर : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक रविवारी पार पडली. यात काँग्रेसला ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, भाजप ४ तर शिवसेनेला ३ ठिकाणी यश मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या या सामन्यात भाजप-सेना युती व काँग्र्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सामना टफ राहिला. जिल्ह्यांचे लक्ष लागलेल्या व भाजपच्या ताब्यातील सावनेर पं.स.वर काँग्रेसचा झेंडा फडकला. १२ सदस्यांपैकी ६ काँग्रेस ,५ भाजप व १ अपक्ष असे संख्याबळ आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने अपक्षाच्या मदतीने सत्ता हस्तगत केली होती. यावेळी केदार गटाने मोर्चेंबांधणी करून अपक्षाच्या मदतीने सत्ता काबीज केली. उमरेड पंचायत समितीत ६ पैकी ३ भाजप , २ बसपा व १ काँग्रेसचा सदस्य आहे. गेल्यावेळी बसपाचा सभापती होता. यावेळी बसपा व काँग्रेस सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने सभापती व उपसभापतीपदी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. बहिष्कारासाठी पडद्याआड सौदेबाजी झाल्याची चर्चा आहे.हिंगणा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे सभापती व उपसभापती बिनविरोध निवडून आले. माजी मंत्री रमेश बंग गटाने यावेळीही सत्ता कायम ठेवली आहे. काटोलात अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या गटाला ईश्वरचिठ्ठीने तारले. येथे सभापती राष्ट्रवादीचा तर उपसभापती भाजपचा निवडून आला. नरखेड पंचायत समितीत शिवसेनेचे सभापती राजेंद्र हरणे तर भाजपच्या उपसभापती माया दुरुगकर यांची फेरनिवड करण्यात आली. कुही पंचायत समितीत शिवसेना बंडखोर सदस्यांच्या मदतीने काँग्रेसने सत्ता कायम ठेवली. कामठी येथे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाने सत्ता कायम ठेवली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौद्यात जोर लावल्यानंतरही भाजपला पराभव स्वीकारावा लागला. अटीतटीच्या सामन्यात शिवसेनेने राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता काबीज केली. भिवापूर, कळमेश्वर व कुही पंचायत समितीत काँग्रेसने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. नागपूर पंचायत समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीत आमदार विजय घोडमारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.अटीतटीच्या सामन्यात ६ विरुद्ध ५ च्या फरकाने भाजपने पुन्हा बाजी मारली. (प्रतिनिधी)काँग्रेस, भाजपचे संख्याबळ वाढलेसभापतिपदाच्या निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता काँग्रेस, भाजपचे प्रत्येकी ४, राष्ट्रवादी २ तर शिवसेनेचे ३ सभापती निवडून आले आहे. गेल्यावेळी काँग्रेस, भाजपचे प्रत्येकी ३ तर सेनेचे ४ सभापती होते. एका ठिकाणी बसपाचा सभापती होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कायम आहे. काँग्रेस, भाजपचा प्रत्येकी १ सभापती वाढला आहे.