शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

युती...अवघड जागेचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 01:07 IST

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

संदीप प्रधान / मुंबईप्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईसह अन्य महापालिकांमधील युती तोडण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. गेली काही दिवस या दोन पक्षांमधील वाटाघाटी ज्या पद्धतीने सुरू होत्या, ते पाहता, हे तर होणारच होते. राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडलेली नाही आणि निवडणुकीपूर्वी बाहेर पडण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे युती तोडण्याचा हा निर्णय तत्कालीक व सोईस्कर आहे. निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापन करताना एकमेकांची गरज लागली, तर लागलीच समविचारी पक्ष या नात्याने दोन्ही पक्ष एकत्र येतील. त्या वेळी महापौरपदापासून स्थायी समितीच्या पदापर्यंत वाटाघाटी, रुसवेफुगवे पाहायला मिळतील. मात्र, अखेर दोन्ही पक्ष गळ््यात गळे घालतील. निवडणुकीत अशी विखारी भाषणे करायचीच असतात व नंतर ती विसरायची असतात, अशी निलाजरी कबुलीही देतील. पुन्हा स्थायी समितीमधील सर्वपक्षीय सिंडीकेट सक्रिय होईल आणि पारदर्शक कारभाराची पुढील पाच वर्षे कुणाला आठवण येणार नाही.यापूर्वी १९९२ मध्ये अशीच मुंबई महापालिका निवडणुकीत युती तुटली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून वेगळे होत असल्याचे जाहीर केले. मात्र, ते मतदारांना रुचले नाही. तेव्हा महापालिकेत काँग्रेस-रिपाइंची सत्ता आली होती, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या विभक्त होण्याला पार्श्वभूमी १९९०च्या विधानसभा निवडणुकीची होती. त्या वेळी राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतामधील सरकार सत्तारूढ झाले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी पवार यांचे संबंध बिघडल्यामुळे राज्यात अल्पमतामधील सरकार आणून पवार यांनी आपले महत्त्व वाढवल्याची चर्चा त्या वेळी होती. शिवसेनेचे मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते झाले, ते याच वर्षी आणि त्यामुळे छगन भुजबळ नाराज होऊन शिवसेनेत फुटीची बिजे रोवली गेली, तीही त्याच वर्षी. देशातील हिंदुत्वाचा झंझावात त्या वेळी उन्मादक अवस्थेत होता आणि सत्ता शिवसेना-भाजपाला दिसू लागली होती. त्यामुळे आपापल्या ताकदीचा अंदाज १९९२ च्या महापालिका निवडणुकीत घेतला गेला. हा इतिहास नमूद करण्यामागील हेतू हाच आहे की, मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेचा प्राण आहे. ही सत्ता नसेल, तर शिवसेना गलितगात्र होते. या वेळी पुन्हा शिवसेनेच्या गंडस्थळावर हल्ला केला जात असून, हा हल्लेखोर शिवसेनेचा २५ वर्षांचा मित्रपक्ष भाजपा आहे.बाबरी मशिदीच्या पतनानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या सरकारच्या काळात युतीमधील संघर्ष अनेकदा उफाळून आला. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सरकारबद्दल अँटी इन्कम्बन्सी असतानाही युतीच्या जागा १३ ने कमी झाल्या होत्या. त्यात भाजपाच्या जागा गतवेळीपेक्षा ९ने तर शिवसेनेच्या जागा गतवेळीपेक्षा ४ने घटल्या होत्या. तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी सत्ता स्थापनेसाठी तीनदा संधी दिली. मात्र, नारायण राणे व गोपीनाथ मुंडे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षात पुन्हा युतीचे सरकार आले नाही. एकाच विचारधारेच्या दोन पक्षांत सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती असावी, यावरून सुरू असलेला संघर्ष जुना आहे. त्यामुळे २५ वर्षे युती करून सडलो, हे उद्धव ठाकरे यांचे विधान अर्धसत्य आहे. युती नसती, तर सत्ता दिसली नसती आणि सत्ता दिसली नसती, तर युतीमध्ये सडल्याची भावना प्रबळ झाली नसती.