शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

मुंबईसाठी युतीची समन्वय समिती

By admin | Updated: August 9, 2016 07:20 IST

पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध दंड थोपटत असतानाच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध दंड थोपटत असतानाच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुंबईतील नागरी प्रश्न, विशेषत: गृहनिर्माण प्रकल्प (एसआरए, बीडीडी चाळ पुनर्विकास, धारावी पुनर्विकास आदी) तसेच मुंबईच्या विकास आराखड्यासंदर्भात (डीपी) भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांची एक समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पक्षांचे मुंबईतील काही मंत्रीदेखील या समितीमध्ये असतील. या समितीच्या नियमित बैठका होतील. भाजपाचे मंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामे करीत नाहीत, शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये पुरेसा निधी वा योजना दिल्या जात नाहीत, अशी तक्रार अलीकडे पक्षाच्या प्रतोदांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एका बैठकीत केली होती. या तक्रारीची दखल घेत याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर प्रतोदांची बैठक घेण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार आज उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, डॉ. नीलम गोऱ्हे, शंभूराजे देसाई, संजय शिरसाठ, सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक हे पक्षाचे प्रतोद आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दीड तास बैठक झाली. सर्व प्रतोदांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना भाजपाकडील कोणत्या खात्यांमधून पुरेसा निधी मिळत नाही, याची माहिती प्रतोदांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर आपण त्या मंत्र्यांशी व्यक्तिश: बोलू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे आम्हाला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याची भावना प्रतोदांनी सोमवारच्या बैठकीत मांडली. याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम आणि पाणीपुरवठा व स्वच्छता ही दोन्ही खाती भाजपाकडे आहेत. आमदारांच्या अडकलेल्या कामांची यादी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली. शिवसेनेच्या आमदारांच्या विभागवार बैठका घेऊन त्यांच्या समस्या मुख्यमंत्री सोडविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)