शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकासासाठी आघाडी कटिबद्ध

By admin | Updated: April 5, 2017 03:24 IST

रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले आहेत. तीनही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्रित विचारधारेतूनच शिवतीर्थावर सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसला सर्वाधिक महत्त्वाचे असे आघाडीचे प्रतोदपद दिले आहे. त्यामुळे विविध पदवाटपात काँग्रेसमध्ये नाराजी असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या आघाडीच्या प्रतोदपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजीराव परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध विषय समितींचे सभापती, तसेच आघाडीच्या प्रतोदपदी कोणाची निवड करायची? याचा निर्णय हा शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित घेतला आहे. काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती. त्यामुळे ते आमच्यासोबत सत्तेमध्ये आहेत. आता त्यांच्या वाट्याला सभापतीपद आले नसले, तरी आगामी काळात त्यांना सभापतीपद देण्याबाबत आघाडीचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही, असेही अदिती यांनी स्पष्ट केले. आम्ही एकत्र काम करणारजिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी कटिबद्ध आहे. विकासाच्या सर्व योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही एकत्रित काम करणार आहोत, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.