शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ममता कुलकर्णीचे नाव वदविण्यासाठी पोलिसांनी टॉर्चर केल्याचा जयमुखीचा आरोप

By admin | Updated: July 26, 2016 23:25 IST

अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे नाव इफेड्रीन प्रकरणात गोवण्याकरिता ठाणे पोलिसांनी आपल्याला टॉर्चर केले.

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 26 - अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे नाव इफेड्रीन प्रकरणात गोवण्याकरिता ठाणे पोलिसांनी आपल्याला टॉर्चर केले. आपल्या आई-वडीलांनाही सह आरोपी करण्याची धमकी दिल्याचा आरोप या प्रकरणातील प्रमुख आरोपी जयमुखी याने ठाण्याच्या विशेष न्यायालयात केला. ममता कुलकर्णी हिचा या प्रकरणाशी दूरान्वये संबंध नसल्याचा दावाही त्याने केला.ठाण्याचे विशेष न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात जयमुखीने आपल्या वकीलामार्फत दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, ठाणे पोलिसांनी इफेड्रीन प्रकरणामध्ये ममता कुलकर्णीचे नाव घेण्यासाठी वेगवेगळया प्रकारे जबरदस्ती केली. पोलीस कोठडीत आपल्याला मारहाण करुन गुप्तांगाला वीजेचा शॉकही दिला. आपण शाकाहारी असताना पोलिसांनी मांसाहार केलेली भांडी धुण्यास भाग पाडले. सतरंजी न देता जमिनीवर झोपण्यास भाग पाडले. तसेच आई-वडीलांना आणि बहिणीलाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी दिली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके आणि उपनिरीक्षक अमोल वालझडे यांनी प्रचंड दबाव आणल्याचे त्याने आपल्या अर्जात म्हटले आहे.दरम्यान, जयमुखीला अटक केल्यानंतर त्याने वाशी न्यायालयातच आपला जबाब नोंदविला होता. त्या जबाबामध्ये इफेड्रीनच्या तस्करीबाबतच्या केनियातील बैठकीसाठी ममता, मनोज जैन आणि विकी गोस्वामी हजर होते. सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे तिला ७० टक्के शेअर खरेदी करुन स्वत: मुख्य मालक व्हायचे होते. एव्हॉनचा ४५ रुपयांचा शेअर २६ रुपयांमध्ये खरेदी करुन तिने यासाठीची प्रक्रिया सुरु केली होती. अनेक ठिकाणी विकीच्या वतीने ती स्वत: इफेड्रीन तस्करीची डील करीत होती, अशा अनेक बाबी जयमुखीने नोंदविल्या होत्या. दरम्यान, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तळोजा (नवी मुंबई) मध्यवर्ती कारागृहातून अधीक्षकांमार्फत याच संदर्भात जबाब देण्याची विनंती केली होती. न्या. पटवर्धन यांनी ती मान्य करुन वेगळा काही जबाब द्यायचा आहे का? अशी विचारणा केली. तरीही त्याने वाशी न्यायालयात यापूर्वी दिलेला जबाबच कायम ठेवायचा असल्याचे सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)त्याने यापूर्वीचे दोन्ही जबाब हे न्यायालयातच दिलेले आहेत. दुसरा जबाब दिला त्यावेळी तो न्यायालयीन कोठडीतच होता. त्यामुळे त्याच्यावर दबाव आणण्याचा किंवा त्याला टॉर्चर करण्याचा प्रश्नच नसल्याचा दावा ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी केला. शिवाय, पोलीस कोठडीत असतांना त्याची दर २४ तासांनी वैद्यकीय तपासणीही केली जात होती. त्याला त्रास दिला असता किंवा वीजेचा शॉक दिला असता तर ते या तपासणीतही स्पष्ट झाले असते. इफेड्रीन तपासावरील पोलिसांचे लक्ष विचलीत करण्यासाठी तसेच ममता आणि विकी गोस्वामीला फायदा मिळण्यासाठी जयमुखीची धडपड सुरु आहे. कदाचित त्याच्यावर कोणीतरी दबाव आणून उलटा जबाब देण्यासाठी भाग पाडले असावे. न्यायालयाने आदेश दिले तर याप्रकरणाचीही चौकशीही केली जाईल, असेही शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)* काय आहेत ममतावर आरोपकेनियामध्ये २ ते ७ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत मनोज जैन, विकी गोस्वामी आणि पुनित यांच्याबरोबर आरोपी क्रमांक १४ ममताचा सहभाग.* एव्हॉन लाईफसायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे ५१ टक्के शेअर खरेदी करुन कंपनीची मालकीण होण्याकरिता केले प्रयत्न.* मुख्य आरोपी विकी गोस्वामी याच्यासमवेत इफेड्रीन तस्करीमध्ये महत्त्वाचा सहभाग.*ड्रग तस्करीचा पैसा स्वीकारण्यात विकीबरोबर सहभागी.