शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशाशी ऋणानुबंध तुटलेलेच करतात असहिष्णूतेचे आरोप - मोहन भागवत

By admin | Updated: July 20, 2016 21:08 IST

देशाच्या मातीशी ऋणानुबंध तुटलेले लोक असहिष्णूता वाढली असल्याचे आरोप करतात. परंतु त्यांना याची कल्पना नसते की त्यांच्या या कृतीमुळे देशाची प्रतिमा जगात

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि.20 -  देशाच्या मातीशी ऋणानुबंध तुटलेले लोक असहिष्णूता वाढली असल्याचे आरोप करतात. परंतु त्यांना याची कल्पना नसते की त्यांच्या या कृतीमुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होते. देशाशी आपण जोडले गेले आहोत हे त्या लोकांच्या लक्षात येत नाही, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी असहिष्णूतेचे आरोप करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. प्रा.अरविंद खांडेकर लिखित ह्यऋणानुबंधह्ण या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान ते बुधवारी नागपूरात बोलत होते.धंतोली येथील अहिल्या मंदिरात झालेल्या या कार्यक्रमादरम्यान प्रा.अरविंद खांडेकर तसेच संस्कार भारतीचे प्रांतमंत्री आशुतोष अडोणी प्रामुख्याने उपस्थित होते. संस्कृती आणि संस्कारांशी असलेले नागरिकांचे ऋणानुबंध ही देशाची ओळख आहे. परंतु ऋणानुबंध सैल होत गेले तर देश नीट चालणार नाही. आपल्या देशाला प्रगतीकडे न्यायचे असेल तर पुढील पिढ्यांपर्यंत ही ओळख गेलीच पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.देशात हिंदुत्वाच्या व्याख्येसंदर्भात अनेक वाद, चर्चा होत असतात. परंतु आमच्या दृष्टीने हिंदुत्वाचा सोपा व सरळ अर्थ म्हणजे माणुसकी व बंधुभाव असा आहे. हिंदुत्व हा धर्म आहे, परंतु त्याला इंग्रजी भाषेतील ह्यरिलिजनह्णशी जोडणे योग्य नाही. संघ सर्वांशी जुळला पाहिजे असे प्रयत्न असतात. संघातील स्वयंसेवकांना लोक पागल म्हणतात. परंतु संघाला कुणीही वाईट किंवा निरुपयोगी वाटत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंसेवक कधीच निराश होत नाही, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. सरसंघचालक २६ जुलै रोजी लंडनला जाणारआंतरराष्ट्रीय पातळीवर संघाचे काम करणाऱ्या हिंदू स्वयंसेवक संघाच्या ह्ययुनायटेड किंगडमह्ण शाखेतर्फे संस्कृती या महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सरसंघचालक सहभागी होणार आहेत. ते २६ जुलै रोजी लंडनला जाणार आहेत. हर्टफोर्डशायर येथील या शिबीरात ते २९ ते ३१ जुलै या कालावधीत सहभागी होतील. यावेळी ते लंडनमधील विविध मान्यवरांच्यादेखील भेटी घेणार आहेत.