शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानियांची आरोपबाजी

By admin | Updated: May 18, 2017 02:00 IST

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आॅर्थर रोड तुरुंगात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची शाही बडदास्त राखण्यात येत असल्याबाबत, सामाजिक

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आॅर्थर रोड तुरुंगात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची शाही बडदास्त राखण्यात येत असल्याबाबत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निराधार असून, केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी आरोपबाजी करण्यात येत आहे. नियमानुसारच घरचा डबा मिळत असल्याचा खुलासा भुजबळांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. भुजबळांसाठी तुरुंगात पाच फुटी टीव्ही सेट, दर दोन तासांनी फळे, चिकन मसाला वगैरे पुरविण्यात येते. शिवाय, समीर भुजबळांना तुरुंगात व्होडकाही पुरवली जात असल्याचा आरोप दमानिया यांनी मंगळवारी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही दमानिया यांनी तुरुंग विभागाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यानंतर, आज बुधवारी भुजबळांच्या वतीने या आरोपांचा समाचार घेण्यात आला आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांना तुरुंगात घरचा डबा येतो. केवळ दिवसातून दोन वेळा येणारा हा डबा तुरुंग प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसारच येतो. दर दोन तासांनी डबा येतो, हा आरोप खोटा असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे. भुजबळांच्या कोठडीबाहेर आणि तुरुंगात सर्वत्र सीसीटीव्हीची निगराणी आहे. नियमानुसार तुरुंगात कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू अथवा दारू आणता येत नाही. त्यामुळे आमच्या कोठडीत टीव्ही आहे, दारू आणली जाते, हा आरोप निराधार असून, सीसीटीव्हीद्वारे कोणीही याची शहानिशा करू शकतो, असे आव्हानच भुजबळांनी दिले. भुजबळ कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी विरोधकांच्या इशाऱ्यावरून अंजली दमानिया खोटे-नाटे आरोप करीत आहेत. अशा आरोपांच्या माध्यमातून तुरुंग प्रशासन, पोलीस आणि न्याययंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला. तसेच वकिलांचा सल्ला घेऊन दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्यामार्फत चौकशी केली जाणार असल्याचे भूषणकुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले.