शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

२६/११ हल्ला प्रकरणातील अबू जुंदालवरचे आरोप निश्चित

By admin | Updated: November 5, 2015 03:02 IST

लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेटिव्ह आणि मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सयद झैबुद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदालवर बुधवारी सत्र न्यायालयाने

मुंबई : लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेटिव्ह आणि मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सयद झैबुद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदालवर बुधवारी सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले. या वेळी २६/११ मुंबई हल्ल्याप्रकरणी आपण निर्दोष असल्याचे अबूने न्यायालयाला सांगितल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.अबू जुंदालला बुधवारी न्या. जी. ए. सानप यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्या. सानप यांनी जुंदालवर कोणते आरोप निश्चित केले आहेत? त्या अंतर्गत शिक्षेची काय तरतूद आहे, हे जुंदालला समजावून सांगितले. त्यावर जुंदालने तो निर्दोष असल्याचे न्या. सानप यांना सांगितले. कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध छेडणे, हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, हत्येसाठी अपहरण करणे, फसवणूक करणे, पाकिस्तानात बसून भारतावर दहशतवादी हल्ला करणे असे आरोप जुंदालवर निश्चित करण्यात आले आहेत. आयपीसीशिवाय जुंदालवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा, रेल्वे कायदा, कस्टम कायदा, एक्सप्लोझिव्ह अ‍ॅक्ट, एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स अ‍ॅक्ट व सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याबद्दलही आरोप ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानी-अमेरिकन लष्कर-ए-तोयबाचा सदस्य डेव्हिड हेडली यालाही या खटल्यात आरोपी करण्याच्या पोलिसांच्या अर्जावर युक्तिवाद करण्यात येईल, असेही अ‍ॅड. निकम यांनी सांगितले. हेडलीला व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यासंदर्भात पोलिसांनी न्यायालयाला अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायालयाने ८ आॅक्टोबर रोजी अमेरिकेला ‘लेटर आॅफ रिक्वेस्ट’ पाठविले होते. जुंदालवर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी जुंदालच्या पाकिस्तानातील अतिरेकी प्रशिक्षणापासून ते २६/११ च्या हल्ल्याची योजना कशी आखण्यात आली इत्यादीची माहिती नमूद करण्यात आली आहे. जुंदालने त्याच्या कबुलीजबाबात पाकिस्तानच्या एलईटी ट्रेनिंग कॅम्पला, स्थानिकांपासून तेथील पोलिसांचे आणि निमलष्करी संघटनाचे कशाप्रकारे समर्थन आहे, याबद्दलची सर्व माहिती पोलिसांना दिली. तो औरंगाबादमधील शस्त्रसाठा प्रकरण, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट आणि नाशिक पोलीस अ‍ॅकॅडमीवर केलेल्या हल्ल्याप्रकरणीही आरोपी आहे. (प्रतिनिधी)