शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच सर्वेक्षणांमध्ये राज्यात युतीची आघाडी!

By admin | Updated: May 13, 2014 03:16 IST

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार विविध वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा दिल्या आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार विविध वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक जागा दिल्या आहेत. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही आणि या पक्षाला ८ ते १० जागांचा फटका बसेल. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी ८ जागा जिंकल्या होत्या. या पक्षाला यावेळी तेवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असा अंदाज आहे़ सीएनएन-आयबीएन आणि टाइम्स नाऊने काँग्रेस-राष्ट्रवादीला इतर सर्वेक्षणांपेक्षा अधिक जागा दाखविल्या आहेत. गेल्यावेळी ९ जागा जिंकणार्‍या भाजपाला यावेळी सर्वात जास्त फायदा होताना दिसतो. ११ जागा जिंकणारी शिवसेनाही यावेळी फायद्यात दिसते. मनसे एका जागेसह खाते उघडेल, असे भाकित एनडीटीव्हीने वर्तविले आहे. तर आम आदमी पार्टीला केवळ एबीपी-नेल्सनने एक जागा दिली आहे. बहुजन समाज पार्टीचे खाते उघडताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपा-शिवसेना महायुतीची मतांची टक्केवारी निि›तच वाढलेली असेल, असे प्रत्येक एक्झिट पोलमध्ये दिसते. (विशेष प्रतिनिधी)----------------------------------------------एक्झिट पोलपेक्षाही जास्त जागा महायुतीला मिळतील. आम्ही ३५ ते ४० जागा जिंकू. केंद्र आणि राज्य सरकारच्या कुशासनाविरुद्ध कौल देतानाच राज्यातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर एकमुखाने विश्वास व्यक्त केल्याचे १६ तारखेला स्पष्ट होईल. - देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.एक्झिट पोलची आकडेवारी आम्हाला मान्य नाही. १६ तारखेचा निकाल वस्तुस्थिती सांगेलच. २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा यावेळी आम्ही फार मागे राहणार नाही. - माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस. ----------------------------------------------------स्रोत काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा शिवसेना मनसे आप इतर सी-व्होटर ०९ ०५ १७ १४ सीएनएन-आयबीएन आघाडी - १६ ते २२ महायुती - २३ ते २९टाइम्स नाऊ आघाडी - २१ महायुती - २७एबीपी-नेल्सन ०९ ०६ २१ ११ ०१एनडीटीव्ही आघाडी - १० महायुती - ३६ ०१ ०१आजतक/इंडिया टुडे आघाडी - ११ ते १५ महायुती - २७ ते ३५ २ ते ६