शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराच्या ओझ्यातून सर्व विद्यार्थ्यांची सुटका

By admin | Updated: April 1, 2016 01:59 IST

राज्य सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात काढलेली अधिसूचना आता केवळ अनुदानित शाळांपुरतीच मर्यादित न राहता सीबीएससी, आयसीएससी, आयबी इत्यादी बोर्डांच्या शाळांनाही

मुंबई : राज्य सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात काढलेली अधिसूचना आता केवळ अनुदानित शाळांपुरतीच मर्यादित न राहता सीबीएससी, आयसीएससी, आयबी इत्यादी बोर्डांच्या शाळांनाही लागू होईल, अशी माहिती गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. मात्र या अधिसूचनेवर शाळा अंमलबजावणी करतात की नाही, हे पाहण्यासाठी सरकारकडे यंत्रणा नसल्याने उच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली.विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांच्या वजनापेक्षा १० ते २० टक्के अधिक ओझे असल्याने राज्य सरकारला विद्यार्थ्यांचे शाळेचे वेळापत्रक बदलण्याचे आदेश द्यावेत. तसेच शाळेत लॉकर पद्धत सुरू करावी आणि ई-लर्निंग पद्धतीचा वापर करावा, अशी मागणी चेंबूरच्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने अनुदानित, विनाअनुदानित व अन्य बोर्डांच्या शाळांनाही ५ नोव्हेंबर २०१५ ची अधिसूचना लागू केली आहे का? तसेच आतापर्यंत किती शाळांनी या अधिसूचनेची अंमलबजावणी केली आहे? आणि अंमलबजावणी न करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? याची तपशिलवार माहिती राज्य सरकारकडून मागितली होती. गुरुवारच्या सुनावणीवेळी अनुदानित, विनाअनुदानित शाळांसह राज्यात असलेल्या अन्य बोर्डाच्या शाळांनाही ही अधिसूचना लागू होईल, असे सरकारने खंडपीठाला सांगितले. ‘कारवाईसाठी कोणती यंत्रणा राज्य सरकारडे उपलब्ध आहे, याबाबत सरकारने मौन बाळगले आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने २८ एप्रिल रोजी याबाबत माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. (प्रतिनिधी) आतापर्यंत किती शाळांनी यावर अंमलबजावणी केली व अधिसूचनेची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर काय कारवाई करणार, याबाबत सरकारने काहीच नमूद न केल्याने उच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली. कारवाईसाठी कोणती यंत्रणा राज्य सरकारडे उपलब्ध आहे, असे न्यायालयाने विचारले.