शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच धार्मिक शिक्षण शाळाबाह्य

By admin | Updated: July 3, 2015 03:57 IST

मदरसे, वेदपाठशाळा, गुरुद्वारा अशा सर्वच ठिकाणी धार्मिक शिक्षण घेणारी मुले ही शाळाबाह्य मुले मानण्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे. त्यामुळेच मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण

मुंबई : मदरसे, वेदपाठशाळा, गुरुद्वारा अशा सर्वच ठिकाणी धार्मिक शिक्षण घेणारी मुले ही शाळाबाह्य मुले मानण्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे. त्यामुळेच मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना गणित, विज्ञान, सामान्यज्ञान आदी विषयांचे शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.तावडे म्हणाले की, राज्यातील १ हजार ८८९ मदरशांमध्ये शिक्षण घेणारी १ लाख ४८ हजार मुले धार्मिक शिक्षण घेत असल्याने राज्य सरकारने त्यांना शाळाबाह्य ठरवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त काही इंग्रजी वृत्तपत्र व वाहिन्यांनी गुरुवारी दिले. राज्यातील भाजपाच्या सरकारने मदरशांच्या बाबतीतच हा निर्णय घेतल्याचा बातम्यांचा सूर होता. हे धादांत असत्य असल्याचे तावडे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)प्रत्यक्षात केंद्र सरकारने केलेल्या शिक्षण हक्क कायद्यात धार्मिक शिक्षण घेणारी मुले ही शाळाबाह्य मानण्याची तरतूद आहे. त्यामुळे केवळ मदरशातील नव्हेतर कुठल्याही पद्धतीचे धार्मिक शिक्षण घेणारी मुले शाळाबाह्य मानण्याची तरतूद मूळ कायद्यात आहे.- विनोद तावडेया निर्णयावरून सरकारची मुस्लीम समाजाबद्दलची मानसिकता स्पष्ट होते. मुस्लीम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्याप्रकरणी यापूर्वीही ही मानसिकता उघड झाली होती. या निर्णयावर फेरविचार करावा. - राधाकृष्ण विखे, विरोधी पक्ष नेतेव्यथित होण्याचे कारण नाहीमदरशांमध्ये शासकीय अभ्यासक्रमही शिकविण्यास शासन जर आर्थिक मदत करण्याचे धोरण तयार करीत आहे तर ते स्वागतार्ह आहे. राज्यात मदरसा बोर्डाला मान्यताच नसल्यामुळे मदरशांची मान्यता काढून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३० अनुसार प्रत्येक मुस्लिमांना मदरसा स्थापन करण्याचा अधिकार आहे. परंतु, शासनाकडे अनुदान मागण्याचा अधिकार नाही. सध्या कोणत्याही मदरशाला अनुदान देण्यात येत नाही. शासनाचे तसे धोरण नाही. यामुळे शासनाच्या निर्णयामुळे मुस्लिमांनी व्यथित होण्याचे काहीच कारण नाही. - अ‍ॅड. फिरदोस मिर्झा