शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत - अबु आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 18:44 IST

देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे

ऑनलाइन लोकमतधुळे, दि.19 - देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे, अशी स्पष्ट भुमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु आझमी यांनी धुळयात मांडली़समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आझमी धुळयात आले होते़ या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, भाजप सरकार केवळ धार्मिक तेढ निर्माण करीत असून सर्वसामान्यांचे प्रश्न राज्यात कायम आहेत़ शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे, सुर्यनमस्काराची सक्ती केली जात आहे, मुस्लीम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप केला जात आहे, मुंबईत ५१ हजार अनधिकृत इमारती असतांना गोरगरिबांच्या झोपड्या तोडल्या जात आहेत, सर्वत्र भ्रष्टाचार वाढला असल्याचे सांगत त्यांनी विविध विषयांवर भुमिका मांडली़ ए दिल मुश्कील चित्रपटाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंवरही आझमी यांनी टिका केली़ एकिकडे राज ठाकरे चित्रपट प्रदर्शनास विरोध करीत असून भाजप सरकार चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आग्रही आहे़ त्यामुळे खरे देशद्रोही कोण? असा प्रश्न अबु आझमी यांनी उपस्थित केला़ तसेच जो न्याय सर्वसामान्यांना दिला जातो तोच राज ठाकरेंना देऊन त्यांची दादागिरी थांबवायला हवी असेही आझमी म्हणाले़ तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी अत्यंत दुबळे झाले असून बाळासाहेब ठाकरेंसारखी खंबीर भुमिका उरली नसल्याची टिका आझमी यांनी केली़ समान नागरिक कायद्याला विरोध करणार असल्याचे सांगत त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले़ यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते़मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे सांगत अबु आझमी यांनी पक्षाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली़ शिवाय सेना-भाजपसह त्यांनी काँग्रेसवरही टिका केली़