शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

युती-आघाडी तुटल्याने जिल्ह्यात सर्वपक्षीय चुरस

By admin | Updated: October 13, 2014 04:49 IST

राज्याच्या सत्तासोपानाच्या लढाईत विधानसभेच्या १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत १७ मतदारसंघांत शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीने काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीला धोबीपछाड दिले होते़

राज्याच्या सत्तासोपानाच्या लढाईत विधानसभेच्या १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत १७ मतदारसंघांत शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीने काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीला धोबीपछाड दिले होते़ यामुळे जिल्ह्यातील पुन्हा अशाच विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीचा घटस्फोट झाल्याने आमदार होण्याची स्वप्ने रंगवणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे़ ठाणे हा युतीचा बालेकिल्ला समजला जातो. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात १८ पैकी ९ जागा युतीने जिंकल्या होत्या. ६ ठिकाणी राष्ट्रवादी, २ ठिकाणी मनसे आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने विजय नोंदविला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तीनपैकी दोन मतदारसंघांत शिवसेना आणि एका ठिकाणी भाजपाची सरशी झाली. ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, अंबरनाथ, शहापूर, भिवंडी पूर्व या सहा ठिकाणी शिवसेनेचे तर डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी ग्रामीण या मतदारसंघांत भाजपाचे आमदार प्रतिनिधित्व करतात. या ठिकाणी मतविभाजनाचा फटका दोन्ही पक्षांना बसणार आहे. त्यात भाजपाची जिल्ह्यातली अवस्था तोळामासा आहे़, तर शिवसेनेला ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरी पट्ट्यात आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी झगडावे लागत आहे. मराठी माणूस एकत्र आल्याने भाजपाला नाकीनऊ आले आहे़ठाणे शहरात कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा या दोन मतदारसंघांत काँगे्रस-भाजपाने तगडे उमेदवार न दिल्याने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांची लढाई सोपी झाली आहे़ मात्र, ठाणे शहर मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र फाटक, भाजपाचे संजय केळकर, राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, काँगे्रसचे नारायण पवार अशी चौरंगी लढत आहे़ कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना या खेपेला कसरत करावी लागत आहे़ नवी मुंबईत शिवसेना-भाजपा युतीतली दुही आता नाईक पिता-पुत्राच्या पथ्यावर पडणारी आहे. मीरा-भार्इंदर मतदारसंघात काँगे्रसचे याकुब कुरेशी, राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा, शिवसेनेचे प्रभाकर म्हात्रे अन् भाजपाचे नरेंद्र मेहता अशी चौरंगी लढत अपेक्षित आहे़कल्याण पूर्व मतदारसंघात विजय मिश्रा- काँग्रेस, निलेश शिंदे- राष्ट्रवादी, गोपाळ लांडगे- शिवसेना, विशाल पावशे- भाजपा आणि नितीन निकम- मनसे आणि अपक्ष गणपत गायकवाड अशी षटकोनी लढत असली खरी चुरस शिवसेनेच्या गोपाळ लांडगे आणि अपक्ष गणपत गायकवाड यांच्यात आहे़़ कल्याण पश्चिम मतदारसंघात काँगे्रसचे सचिन पोटे, राष्ट्रवादीचे संजय पाटील, शिवसेनेचे विजय साळवी, भापजाचे नरेंद्र पवार आणि मनसेचे विद्यमान आमदार प्रकाश भोईर यांच्यात पंचरंगी चुरस पाहायला मिळणार आहे़कल्याण ग्रामीणमध्ये काँगे्रसच्या शारदा पाटील, राष्ट्रवादीचे वंडार पाटील, शिवसेनेचे सुभाष भोईर, मनसेचे रमेश पाटील यांच्यात चुरस आहे़ भिवंडी पूर्व मतदारसंघात मोहम्मद फजिल अन्सारी- काँग्रेस, शेख खलिद गुड्डू- राष्ट्रवादी, रूपेश म्हात्रे- शिवसेना, संतोष शेट्टी- भाजपा आणि अबू आझमी- समाजवादी पार्टी अशी पंचरंगी लढत आहे़ भिवंडी पश्चिममध्ये खान शोएब अशफाक- काँग्रेस, अब्दुल ताहीर- राष्ट्रवादी, मनोज काटेकर- शिवसेना, महेश चौगुले- भाजपा आणि अब्दुला अन्सारी- समाजवादी यांच्यात चुरस आहे़ भिवंडी ग्रामीणमध्ये सचिन शिंगडा- काँग्रेस, महादेव घाटाळ- राष्ट्रवादी, शांताराम मोरे- शिवसेना, शांताराम पाटील- भाजपा आणि दशरथ पाटील- मनसे यांच्यात चुरस आहे़ शहापूर मतदारसंघात पद्माकर केवारी- काँग्रेस, पांडुरंग बरोरा- राष्ट्रवादी, दौलत दरोडा-शिवसेना, अशोक ईरनक- भाजपा आणि ज्ञानेश्वर तलपडे- मनसे अशी पंचरंगी लढत आहे. मुरबाड मतदारसंघात काँग्रेसचे राजेश घोलप, गोटीराम पवार-राष्ट्रवादी, वामन म्हात्रे- शिवसेना, किसन कथोरे-भाजपा यांच्यात चुरस आहे़ अंबरनाथ मतदारसंघात कमलाकर सूर्यवंशी- काँगे्रस, महेश तपासे- राष्ट्रवादी, बालाजी किणीकर- शिवसेना, राजेश वानखेडे- भाजपा, विकास कांबळे- मनसे अशी पंचरंगी लढत आहे़