शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व महापालिकांत क्लस्टर हवे

By admin | Updated: July 15, 2017 03:25 IST

ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, नवी मुंबई अशा महापालिका क्षेत्रांतही पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेचे प्रस्ताव तयार करून ते त्वरित मंत्रालयात पाठवावेत, जेणेकरून ठाणे पॅटर्नप्रमाणे सर्व महापालिकांसाठी त्याची मागणी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवन सभागृहात ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आणि जुना आहे, असा मुद्दा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी या बैठकीत उपस्थित केला. तेव्हा कल्याण आणि मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महापालिकांनी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले. पण, त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे पुढे आले आहे. याचदरम्यान, खासदार कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेची इमारतही महापालिकेने धोकादायक जाहीर केली असल्याचे सांगताना, क्लस्टरमध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत सूचना त्यांनी केली. त्या वेळी पालकमंत्र्यांनी तीच इमारत नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या इतर शासकीय इमारती मिळून क्लस्टर योजनेंतर्गत बांधकाम करता येईल, हे पाहावे लागेल. जर तसेच झाल्यास ते सर्व एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. तर, जिल्ह्यातील पालिकांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करून त्याचा प्रस्ताव पाठवण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले. >ओसी नाही म्हणून डिम्ड कन्व्हेअन्स प्रक्रिया न थांबवण्याचा ठराव मुख्यमंत्र्यांना पाठवणारकेवळ भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नाही, म्हणून मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेअन्स) प्रक्रि या थांबवू नये, त्यासाठी मुंबईप्रमाणे एमएमआरडीए क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थानादेखील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करून तसा ठराव मांडला. त्या वेळी पालकमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवून ठराव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून या विषयाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही दिले.या बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘परिवर्तन’ त्रैमासिकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. याप्रसंगी खासदार आणि आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.