शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

सारेच शोकमग्न

By admin | Updated: June 4, 2014 01:06 IST

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा परसरली आहे. राजकारणापलीकडे जाऊन मैत्री करण्याचा, ती जपण्याचा वकूब मुंडेंकडे होता.

कार्यकत्र्याशी जोडलेला नेता
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा परसरली आहे.  राजकारणापलीकडे जाऊन मैत्री करण्याचा, ती जपण्याचा वकूब मुंडेंकडे होता.  राजकारणात कितीही कटुता आली, परिस्थिती कितीही बिघडली तरी न डगमगता त्यातून वाट काढण्याचा हातखंडा मुंडेंकडे होता. कार्यकत्र्याशी जोडलेला नेता अशी त्यांची ओळख होती.
- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र 
 
ग्रामीण भारताचे नुकसान 
ग्रामीण विकासाबद्दल मुंडे यांचा सखोल अभ्यास होता. शेतीविषयक प्रश्नांची त्यांना जाण होती. तसेच कष्टक:यांची कणवही होती. राज्यासह देशाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या या अकाली अपघाती निधनाने विशेषत: ग्रामीण भारताचे अतोनात नुकसान झाले.  
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
 
बुलंद आवाज लुप्त झाला
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात मुंडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा बुलंद आवाज लुप्त झाला आहे. राज्याच्या हितासाठी नेहमीच त्यांनी सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना जनमानसात प्रचंड लोकप्रियता लाभली होती. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
 
मन मानत नाही -उद्धव ठाकरे  
आमचे मित्र गोपीनाथ मुंडे गेले, यावर अजूनही विश्वास बसत नाही. मन मानायलाच तयार नाही. ‘मातोश्री’वर फोन करून ‘उद्धवजी, आता विधानसभेच्या तयारीला लागू या़ महायुतीची बैठक लावा, मी पोहोचतोच,’ असे सांगतील असा विश्वास होता. पण तसे यापुढे घडणार नाही. दिल्लीत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी मुंडे गेले. पण दिल्लीतूनच त्यांनी अखेरचे प्रस्थान ठेवले. अनेक अपघातांतून मुंडे बचावले. तसे ते पुन्हा खंबीरपणो उभे राहिले व महाराष्ट्राचा हा मोहरा काळाने हिरावून नेला. 
 
मुंडेंना निळा सलाम
गोपीनाथ मुंडे हे विशाल व्यक्तिमत्त्व होते. नामांतर लढय़ात आम्ही सोबत लढलो. महायुतीचा ते भक्कम खांब होते. पण अपघाती चक्रीवादळात हा खांब निखळून पडला आहे. आंबेडकरी चळवळीबद्दल त्यांना प्रचंड अस्था होती. त्यांच्या निधनाने रिपाइंचेही मोठे नुकसान झाले आहे.  
- रामदास आठवले, अध्यक्ष, रिपाइं
 
आधारस्तंभ हरपला
गेली काही वर्षे अनेक अडचणी सोसून ते उभे राहिले होते. इतर मागासवर्गीय आणि ओबीसी चळवळीत त्यांचे कार्य प्रचंड मोठे आहे. देशात व राज्यात वेळोवेळी ओबीसींच्या प्रश्नांसाठी कुणाचीही पर्वा न करता त्यांनी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या जाण्याने ओबीसी चळवळीचाही आधारस्तंभ हरपला आहे.
- छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री
 
शिवसेनेचेही नुकसान
शिवसेना आणि भाजपाची गेल्या अनेक वर्षापासून युती आहे. यामध्ये मुंडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने शिवसेनेचेही नुकसान झाले.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना 
 
तळागाळातील जनतेच्या
प्रश्नांबाबत बांधिलकी
गोपीनाथ मुंडे हे लोकनायक होते. खडतर परिश्रमाने सार्वजनिक जीवनात ते समोर आले. राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्या ठायी होती. गरीब आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची बांधिलकी होती. राज्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते, अशा शब्दांत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली.
 
झुंजार नेता गमावला
महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाळ जुळलेला, निधडय़ा छातीचा अन् झुंजार नेता आपण गमावला आहे. प्रचंड संघर्ष करणारे आणि दांडगा लोकसंपर्क असलेले ते लोकनेते होते.
- आर. आर. पाटील,  गृहमंत्री 
 
पितृछत्र हरपल्यासारखे वाटते
आज आमचे पितृछत्र हरपल्यासारखे माङयासह पक्षजनांनाही वाटत आहे. दुसरे मुंडे आता होणो नाही. पक्ष कार्यकत्र्याना झालेले दु:ख शब्दांत सांगणो अवघड आहे. महाराष्ट्रात भाजपाची उभारणी करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. पक्षाचा सामाजिक पाया विस्तारला आणि उपेक्षित समाजघटकांना नेतृत्वाची संधी दिली. 
- देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
 
सकारात्मक राजकारणी
सामान्य कुटुंबात जन्मलेली एक व्यक्ती संघर्ष व इच्छाशक्तीच्या बळावर सकारात्मक राजकारण व समाजकारण यशस्वीपणो करू शकतो, हे मुंडे यांच्या रूपाने दिसले. एक दिलदार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 
- हर्षवर्धन पाटील, संसदीय कामकाज मंत्री 
 
सर्वसामांन्याबद्दल जिव्हाळा 
महाराष्ट्रासह महायुतीलाही त्यांची पोकळी जाणवेल. लोकसभा निवडणुकीत त्यांनी विविध विचारांच्या पक्षांना एकत्रित आणले. त्यांनी राज्यात सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबवला. त्यामुळे राज्यात महायुतीला चांगले यश मिळाले. या विजयावर कळस चढविण्याची वेळ आली होती. अशातच त्यांचे निधन झाले. मराठवाडय़ातील गरीब कुटुंबातून राजकारणात आल्याने सर्वसामान्यांच्या चळवळीबद्दल त्यांच्या मनात जिव्हाळा होता.
- खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष,
स्वाभिमानी शेतकरी संघटना
 
राष्ट्रविकासासाठी सदैव समर्पित 
मुंडेंच्या निधनाने बहुजन समाजाचा नेता हरपला. लोकभावनेची नस जाणून असलेल्या या नेत्याने नेहमीच प्रवाहाबाहेर राहणा:या लोकांचा आवाज होणो पसंत केले. कर्तबगार नेत्याप्रमाणोच त्यांच्यातील माणूस आणि मित्र समोरच्या माणसाला साद घालत राहिला. राष्ट्रविकासासाठी सदैव समर्पित एक झुंजार वादळ आज शांत झाले. 
- जयंत पाटील , ग्रामविकास मंत्री 
 
भाजपा-सेनेला जोडणारा दुवा
मुंडे हे नेहमी मला एक चालतीबोलती संस्था वाटायचे. भाजपाला मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. कुठल्याही संकटात ते धावून जात. संकटाकडे पाठ करणो त्यांना माहिती नव्हते. भाजपा-शिवसेना यांना जोडणारा मोठा दुवा निघून गेला.  
- मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री 
 
नियतीचा विश्वासघात
मुंडे म्हणजे महाराष्ट्राचा झंझावात. ग्रामपंचायत ते विधानसभा, लोकसभा अशी त्यांच्या यशाची चढती कमान होती. मोदींच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री या नात्याने देशाच्या विकासात मुंडे हे मोलाची कामगिरी बजावतील, असा विश्वास होता, मात्र नियतीने विश्वासघात केला.  
- राम नाईक, माजी केंद्रीय मंत्री